गेली १५ वर्षे सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या आविष्कार फाऊंडेशन शाखा सातारा जिल्ह्याच्या वतीने महिला दिनानिमित्त देण्यात येणा-या राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कारासाठी वेंगुर्ला येथील डॉ.वसुधा मोरे यांची निवड झाली आहे. डॉ.मोरे यांनी योगशास्त्र व वैद्यकशास्त्र यांच्या माध्यमातून जी रुग्णसेवा तसेच योगशास्त्र व क्रीडा विभाग यांच्या माध्यमातून योगपटू निर्माण केले. या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. याबाबत डॉ.मोरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 

Leave a Reply

Close Menu