पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रदिप सावंत, तर सचिवपदी अजित राऊळ

             वेंगुर्ला तालुका पत्रकार समितीच्या कार्यकारीणी निवडीसाठी ९ मार्च रोजी येथील लोकमान्य को ऑप.सोसायटीच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी निवडलेल्या कार्यकारिणीत अध्यक्ष- प्रदिप सावंत, उपाध्यक्ष-के.जी.गावडे, दाजी नाईक, सचिव अजित राऊळ, सहसचिव विनायक वारंग, खजिनदार एस.एस.धुरी, जिल्हा कार्यकारीणी सदस्य- दिपेश परब, सल्लागार अनिल निखार्गे, मॅक्सी कार्डोज, आपा परब, कार्यकारीणी सदस्य- भरत सातोसकर, सिमा मराठे, अनिल राणे, अजय गडेकर, सुरज परब, योगेश तांडेल, प्रथमेश गुरव, संदेश राऊळ, शंकर घोगळे यांचा समावेश आहे. निरिक्षक म्हणून पत्रकार सुहास देसाई व हरिश्चंद्र पवार यांनी काम पाहिले. या बैठकीच्या सुरुवातीस वेंगुर्ला तालुका पत्रकार समितीच्या जेष्ठ सदस्या मिराताई जाधव व वेंगुर्ल्यातीलच जेष्ठ पत्रकार विजय सामंत यांच्या पत्नी उमा सामंत यांच्या निधनानिमित पत्रकार समितीतर्फे त्यांना श्रद्धांजली वाहाण्यात आली.

     यावेळी सुहास देसाई यांची दोडामार्ग तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा तालुका पत्रकार समितीतर्फे सत्कार करण्यात आला. तसेच जागतिक महिला दिनानिमित वेंगुर्ला तालुका पत्रकार समितीच्या एकमेव महिला सदस्या सिमा मराठे याचांही निरिक्षक हरिचंद्र पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

   मावळते अध्यक्ष के.जी.गावडे, नुतन अध्यक्ष प्रदिप सावंत, जेष्ठ पत्रकार अनिल निखार्गे, एस.एस.धुरी, अनिल राणे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत दाजी नाईक, आभार सीमा मराठे यांनी मानले.

Leave a Reply

Close Menu