शेंडी पद्धतीच्या मासेमारीला १४ लाख लोकांची पसंती

              महाराष्ट्रात १ जून ते १५ ऑगस्ट हा मासेमारी बंदीचा कालावधी असतो. हा पावसाळा व माश्यांचा प्रजनन कालावधी असल्याने या अडीच महिन्याच्या कालावधीत मच्छीमार आपल्या होड्या किना-यावर सुरक्षित ठेवतात. या कालावधीत मच्छिमार आपली यंत्रे, होड्या, मासे पकडण्याची जाळी यांच्या डागडुजीचे काम करत असतात. तसेच काही मच्छिमार आपल्या दैनंदिन रोजगारासाठी व जेवणासाठी नदी किवा खाडी पात्रात छोट्या जाळ्याने म्हणजेच शेंडी जाळीच्या साहाय्याने मासेमारी करत असतात. मागील पूर्ण वर्ष हे कोरोना महामारीच्या सावटाखाली गेल्याने मच्छीमारावरही आर्थिक संकट ओढवले होते. या लॉकडाऊनच्या कालावधीत आरवली-टांक येथील मच्छीमार युवक किरण तांडेल याने खाडी पात्रात स्वतः पारंपरिक शेंडी पद्धतीने मासेमारी करतानाचा व्हिडीओ बनविला आणि आपल्या युट्युब चॅनलच्या माध्यमातून तो प्रसारित केला होता. २७ सेकंदाच्या या व्हिडिओत मासेमारी बरोबरच जाळीत मासे मिळाल्याचेही दिसत आहे. सात महिन्याच्या कालावधीत युट्युबवर हा व्हिडीओ तब्बल १४ लाख लोकांनी पहिला असून लुप्त होत चाललेली पारंपरिक शेंडी पद्धतीची मासेमारी एवढ्या लोकांपर्यंत पोहचविल्याबद्दल किरण याचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Close Menu