सुमारे २५० वर्षांची परंपरा असलेल्या या उभादांडा येथील गणपती मंदिरात दरवर्षी लक्ष्मीपूजनादिवशी नवीन मातीच्या गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. याचे विसर्जन होळी सणाच्या पूर्वी होते. सुमारे चार ते साडेचार महिन्यांच्या कालावधीत या मंदिरात संकष्टी उत्सवाबरोबर वार्षिक जत्रोत्सव, तसेच भजने कीर्तने आदी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात. विसर्जनाच्या आदल्या दिवशी मंदिरामध्ये भाविकांसाठी महाप्रसाद असतो. यावर्षी, मात्र कोरोना महामारीचे संकट असल्याने हा महप्रसादाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला.

      नवसाला पावणारा अशी सर्वत्र ख्याती असलेल्या या गणपतीच्या दर्शनासाठी अनेक भागातून भाविक येथे येत असतात. २४ मार्च रोजी सायंकाळी या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान, या गणपतीचे विसर्जन झाल्याने आता लक्ष्मीपूजनापर्यंत मंदिरात गणपतीच्या फोटोचे पूजन केले जाणार आहे.

Leave a Reply

Close Menu