‘सफर वेंगुर्ल्याची‘ पर्यटनाला चालना देणार – भाई मंत्री

कोकणातील माणूस भात, मासे आणि दुपारची झोप मिळाली की, खूश असतो. पण सातत्याने नवनविन संकल्पना राबवून आपल्या उद्योग-व्यवसायात वाढ व्हावी, आपल्या आजूबाजूचा परिसर प्रकाश झोतात यावा यासाठीच्या जाहिरात क्षेत्रात तो अगदीच कमी पडतो. जाहिरात हे आजच्या युगाचे प्रभावी माध्यम आहे. येथील पर्यटनाच्या जाहिरातीसाठी सोशल मिडियाचा करण्यात आलेला वापर निश्चितच पर्यटनाला चालना देणारा आहे असे मत उद्योजक तथा किरात ट्रस्टचे विश्वस्त रघुवीर उर्फ भाई मंत्री यांनी सफर वेंगुर्ल्याचीया चित्रफितीच्या शुभारंभ प्रसंगी केले.

      वेंगुर्ला नगरपरिषदेच्या शिवाजी सभागृहात वेंगुर्ला नगरपरिषद व किरात ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यटनावर आधारीत सफर वेंगुर्ल्याचीया मालिकेतील पहिल्या भागाचे तसेच नगरपरिषदेच्या माझी वसुंधराया ध्वनिफितीचे अनावरण कार्यक्रमाचे आयोजन महिला दिनाचे औचित्य साधून करण्यात आले होते. यावेळी व्यासपिठावर नगराध्यक्ष दिलीप गिरप, मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, चित्रकार सुनिल नांदोस्कर, किरात ट्रस्टचे खजिनदार सुनिल मराठे, सचिव सीमा मराठे आदी उपस्थित होते.

      वेंगुर्ला तालुका हा विविध निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. यामध्ये ऐतिहासिक व पुरातन वास्तू, मंदिर व खाद्य संस्कृती, सण-उत्सव यांच्यासह सांस्कृतिक कला-परंपरा यांचा समावेश आहे. हे सर्व सफर वेंगुर्ल्याचीया चित्रफितीतून मांडण्याचा प्रयत्न वेंगुर्ला नगरपरिषद व किरात ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने केला आहे.     

      ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१आणि माझी वसुंधराअभियानांतर्गत नगरपरिषदेच्यावतीने पंचमहाभूतांचे महत्त्व सांगणा-या ध्वनीफितीचे अनावरण नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये पंचमहाभूतांनी बनलेली वसुंधरा सा-यांच्या गरजा पूर्ण करु शकते. पण एखाद्याचा हव्यास नाही. वसुंधरेचे भवितव्य आपणच वाचवूया. अशा आशयाचे आवाहन नागरिकांसाठी करण्यात आले आहे. ही ध्वनीफित नगरपरिषदेच्या घंटागाड्यांसह इतर गाड्यांवर दररोज प्रसारीत केली जाणार आहे. या कार्यक्रमला सर्व नगरसेवक, चित्रकार सुनिल नांदोस्कर, प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल, ‘माझा वेंगुर्लाचे राजन गावडे, भाजपाचे बाळू देसाई यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक सीमा मराठे यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नगरसेवक प्रशांत आपटे यांनी केले.

 

Leave a Reply

Close Menu