सिंधुदुर्गातील होळी

              हिंदूंच्या सर्वच सणांमध्ये काही ना काही वेगळं वैशिष्ट¬ दिसून येते आणि ते सण साजरे करताना सिंधुदुर्ग जिल्ह्राने एक वेगळंपण राखलं आहे. अलिकडच्या काही वर्षात सिंधुदुर्गातील नेरुर (कुडाळ), पुरळ (देवगड) असनिये (दोडामार्ग), मठ (वेंगुर्ला) आणि कुणकेरी (सावंतवाडी) या गावातील “शिमगोत्सवहे अशाच काही विविध प्रथा परंपरेने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ही प्रथापरंपरा पहाण्यासाठी आणि तेथील स्थानिकांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आजूबाजूच्या तालुक्यातील नागरिक गर्दी करीत आहेत.

        नेरुरचा “मांडउत्सव- कुडाळ तालुक्यातील नेरुर गावात शिमग्याच्या तिस-या दिवशी होणारा “मांड उत्सवहा स्थानिकांच्या कलेला प्रोत्साहन आणि व्यासपिठ मिळवून देण्यासाठी एक पर्वणीच ठरत आहे. नेरुरचा ग्रामदेव कलेश्वर हा मुळातच कलेचा ईश्वर. त्यामुळे इथल्या ग्रामस्थांमध्ये कलेचा अंश आढळतो. श्री कलेश्वराच्या वदरहस्तामुळे याच गावाने दशावतार कलेतील रत्न जगाला दिलीत. शिमगोत्सवातील “मांडामुळे नेरुर गावाची एक वेगळी ओळख सर्वत्र होत आहे. होळीच्या तिस-या दिवशी माड¬ाची वाडी येथील श्री गावडोबा मंदिराकडून “गावडेसमाजाचे रोंबाट तळी घेऊन ढोलताशांच्या गजरात श्री देव कलेश्वराच्या भेटीस येते. या रोंबटामध्ये मद्य, मांस नसल्याने याला “गोडा रोंबाटअसे म्हणतात. भेटीनंतर परतताना प्रत्येक वाडीत या रोंबटाला गा-हाणी घातली जातात. नवस बोलले जातात. हे रोंबाट सायचे टेंब येथे आल्यावर मांडाच्या ठिकाणी गा-हाणी वैगरे होतात आणि त्यानंतर “मांड उत्सवालाप्रारंभ होतो. राधा आणि शिमग्याचे खेळ या मर्यादेत असलेला हा मांडउत्सव विविध हलत्या देखाव्यांच्या संकल्पनेमुळे लोकप्रिय झाला आहे. येथील आना मेस्त्री, दिनू मेस्त्री, बाबा मेस्त्री व विलास मेस्त्री ही मंडळे आध्यात्मिक आणि पौराणिक कथांवर आधारीत बनविलेले ट्रिकसिनयुक्त हलते देखावे भजनाच्या साथीने सादर करतात. विशेष म्हणजे सर्व देखावे 25 ते 30 फुट उंचीपर्यंतचे असतात. एका ग्रुपमध्ये जवळपास 50 ते 60 लोकांचा ग्रुप असतो. तसेच गणपती, मारुती, राक्षस, वाघ, हंस, बदक, फुलपाखरु, किडा, सिंह असे पशूपक्षी कलात्मक पद्धतीने या मांडावर येऊन नृत्य करतात. यात लहान मुलांचाही सहभाग उत्स्फूर्त असतो. या “मांडउत्सवाचे आणखी वैशिष्ट¬ म्हणजे देखावे सादर करणारी जी चार मंडळे आहेत, ती यावर्षी कोणता देखावा सादर करणार याची पुसटशीही कल्पना एकमेकांना नसते. जो तो आपल्या देखाव्यातील वेगळेपण जपण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत असतो.

        पुरळचा “कापडखेळ‘- शिमगोत्सवात देवगड तालुक्यातील पुरळ गावात होणारा “कापडखेळप्रसिद्ध आहे. कित्येक वर्षापासून शिमगोत्सवामध्ये पुरळच्या निशाणासोबत पुरळचे ग्रामस्थ गावामध्ये आपला “कापडखेळसादर करतात. या खेळांना गावचे “गावखेळेम्हणून संबोधले जाते. या कापडखेळांचे वैशिष्ट¬ म्हणजे इतिहासकालीन जसे शिवरायांच्या मावळ्यांनी परिधान केलेले फेटे असतात त्याचप्रमाणे पुरळ गावातील कापड खेळ्यांचे हे फेटे सुबकतेने सजविले जातात. यामुळे या खेळ्यांच्या फेट¬ांची कलाकृती ही लक्षणीय असते. अंगामध्ये शर्ट व कमरेभोवती गोल साड¬ा परिधान करुन हातात काठ¬ा व रुमाल फेर धरुन हा धार्मिक खेळ सादर केला जातो. यामध्ये तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंतचे लोक सहभागी होतात.

        शिमगोत्सवाच्या पहिल्य दिवशी निशाणकाठी घेऊन गावातील प्रमुख पाच मानक-यांच्या घरी जाऊन ढोल-ताशांच्या गजरात हा खेळ खेळला जातो.  यांना देवखेळेही म्हणून संबोधले जाते. मानक-यांच्या घरासमोर “देवखेळेखेळून गेल्यानंंतर गावातील प्रत्येक घरासमोर “कापडखेळेआपला खेळ सादर करतात. येथे नवस बोलणे, नवस फेडणे असे कार्यक्रम केले जातात. हे देवखेळे (कापडखेळे) परगावातील नवस असल्यास विनंतीनुसार त्या गावात जाऊन शिमगोत्सवामध्ये हे देवखेळे त्या नवस असणा-या व्यक्तींच्या घरासमोर निशाणकाठी घेऊन त्या ठिकाणी देवखेळ्यांचा खेळ सादर केला जातो आणि नवस फेडून नविन नवस बोलले जातात. नवसाला पावणारे हे “देवखेळेम्हणून प्रसिद्ध आहेत.

        पुरळ गावातील पावणाई, रवळनाथ मंदिरातील निशाणकाठी व देवतरंग पुरळमधीलच गावराई चव्हाट¬ावर शिमगोत्सव कालावधीत स्थलांतरीत केले जातात. “देवखेळे‘ (कापडखेळे) हे पुरळ गावातील धार्मिकतेची शानच आहे. सात किंवा नऊ दिवसानंतर शिमगोत्सवाची “न्हावानघेऊन सांगता केली जाते.

        असनियेचा शिमगोत्सव – होळी पौर्णिमेच्या आठव्या दिवशी असनियेच्या शिमगोत्सवाला सुरुवात होते. त्यादिवशी संध्याकाळी प्रत्येक घरी राधेचे नृत्य होते. यामध्ये कृष्ण, गोपी आणि दशावतारातील सोंगे असतात. रात्री रोंबाट असते. त्याची पहाटे 4 ला सांगता होते. पहाटे 4 ते 6 पर्यंत दशावतारी नाटक असते. दुस-यादिवशी सकाळी 9च्या सुमाराला मांडावर गांवकरी जमतात. तिथे “हळदवणीसर्वांना तिर्थ म्हणून दिले जाते. यानंंतर दोन लहान मुलांना सजवून गावात सोडले जाते. ही मुले घरोघरी जाऊन आरती म्हणतात. गावात दुपारी रोंबाट असते. होळीचा नारळ दोन गटात स्पर्धा होऊन फोडला जातो. नारळ फोडल्यानंतर गावात चोर सोडले जातात. हे चोर घरातून कोंबड¬, नारळ अशा वस्तू नेतात.

        इकाच्या वाटीचे तीर्थ – होळीनंतर 9व्या दिवशी या महत्त्वाच्या विधीसाठी ग्रामस्थ, चाकरमानी गर्दी करतात. विशिष्ट प्रकारच्या धातूच्या वाटीला वर्षभर कोणी हात लावत नाही. मात्र, त्यादिवशी त्याची पूजा होते. गोसाव्याच्या रुपातील व्यक्ती इकाच्या वाटीतील तीर्थाचे घरोघरी वाटप केले जाते.

        वेंगुर्ला-मठ येथील घोडेमोडणी – वेंगुर्ला तालुक्यातील मठ गावात शिमगोत्सवात चालणारी अनोखी “घोडेमोडणीपूर्वीच्या युद्धाची प्रचिती करुन देते. सुमारे 700 वर्षापूर्वीपासून आदिलशहाच्या राज्याच्या अगोदर शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे गनिमी काव्याने युद्धात विजय मिळविला, त्याप्रमाणे त्याचे एक प्रतिक म्हणून घोडेस्वारी युद्ध आणि ऐतिहासिकता, एकतेचे प्रतिक यांची जपणूक करणारा, आगळावेगळा, सांस्कृतिक परंपरा जपणारा म्हणून मठ शिमगोत्सवाकडे पाहिले जाते.

        शिमगोत्सवाच्या पहिल्या दिवशी रोंबाट आठ वाड¬ांतून काढले जाते. स्वयंभू मंदिर मांगल्याच्या मठाजवळ होळीपूजन होते. त्यानंतर चौथ्या दिवशी सतयेकरवाडीतील सुतारांचा घोडा “गवाची रात्रीदिवशी प्रतिकात्मक “गवामारतो. तो प्रतिकात्मक “गवाहा खळी डोक्यावर घातलेल्या व्यक्तीची शिकार असे दृश्य असते. त्यानंतर मठ गावचे पाच मानकरी गावडे, परब, ठाकूर, धुरी, गावडे-कणकेकर असून कणकेकर-गावडे, सतयेकर-गावडे, मेस्त्री-सतयेकर यांचे घोडे पहाटे ढोल-ताशांच्या गजरात नाचतात.

        पाचव्या दिवशी कणकेकर, गावडे, सतयेकर-मेस्त्री, सतयेकर-गावडे यांचे प्रत्येकाचे मानक-यांचे घोडेस्वारी करण्यासाठी निघतात. प्रतिकात्मक घोड¬ाचे मुख असलेला व शेतीसाठी वापरली जाणारी “ईरलीयांचा वापर करुन, सजवून, गुलाल, रंग, ढोलताशांच्या गजरात आपल्या ठिकाणावरुन स्वारीसाठी निघतात. ज्याप्रमाणे मराठ¬ांनी गनिमीकाव्याने युद्धस्वारी करुन युद्ध जिंकले व विजयोत्सव साजरा केला त्याचेच प्रतिकात्मक घोडेस्वारी लढाई होते. हे दृश्य पाहताना कधी रात्र होते हे समजतही नाही एवढी ही घोडेमोडणी प्रभावी ठरते. त्यानंतर बनाटे फिरविण्यासारखी चित्तथरारक नृत्ये साजरी होतात.

        कुणकेरीचा प्रसिद्ध हुडोत्सव- सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी गावच्या “हुडोत्सवाने आपल्या वैशिष्ट¬पूर्ण अशा प्रथा परंपरांमुळे वेगळपण जपले आहे. दरवर्षी भाविकांच्या अलोट गर्दीत साजरा होणारा “हुडोत्सवसर्वांसाठी पर्वणीच असते. फेब्राुवारी 2012मध्ये या हुड¬ाचे नुतनीकरण करण्यात आले. हा हुडा सागवानी लाकडाचा बनविण्यात आला. ग्रामदेवता श्री देवी भावईच्या कृपा आशीर्वादाने ब्रााहृणांच्या वेद-मंत्रोच्चारात कुणकेरी, आंबेगाव, कोलगांव गावपंच, मानकरी, ग्रामस्थ व हजारो भाविकांच्या उपस्थितीत “हुडाउभारणीचा हा भव्यदिव्य सोहळा पार पडला. हा “हुडासाधारण 100 फुट उंचीचा आहे.

        कुणकेरी गावात फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री भेडला माडाची होळी घातली जाते. ढोलताशांच्या गजरात ही होळी हुड¬ाच्या अगदी शेजारीच उभारली जाते. तर श्री देव लिंग मंदिराकडे आंब्याची होळी घातली जाते. शिमगोत्सवात डफ व घुमट या पारंपरिक वाद्यांचा वापर करुन गावात खेळ खेळले जातात. हे खेळगडी जी गाणी म्हणतात त्यांना “जतीअसे संबोधले जाते. घोडेमोडणी आणि वाघाची शिकार हे सुद्धा या हुडोत्सवाचे वेगळेपण आहे. रोंबटात वाघाची लुटुपुटुची शिकार केली जाते. कोलगांव, कुणकेरी, आंबेगावचे नाते होळीच्या सातव्या दिवशी श्री देवी भावई मातेचा मोठा बंधू आंबेगावचा श्री देव क्षेत्रपाल तसेच लहान बंधू कोलगांवचा श्री देव कलेश्वर आपल्या बहिणीच्या म्हणजेच हुडोत्सवात तरंग, काठीसह, अवसार व मानक-यांसह सहभागी होतात.

        होळीच्या सहाव्या दिवशी रात्री हुड¬ावर व होळीवर पेटत्या शेणी मारल्या जातात. दिवाळी सणातील पाडव्याला शेणाचा गोठा करतात व दुस-या दिवशी या शेणाच्या गोव-या (शेणी) घालतात. याच शेणी होळीवर व हुड¬ावर मारण्यासाठी नेल्या जातात.

        होळीच्या सातव्या दिवशी मुख्य हुडोत्सव असतो. उत्सवावेळी या संपूर्ण हुड¬ाला आंब्याचे टाळ बांधले जातात. तसेच तीन अवसार या हुड¬ावर अगदी लिलया चढतात. यावेळी खाली जमलेल्या भक्तगणांच्या अफाट गर्दीतून या अवसारांवर दगड मारण्याची प्रथा आहे.

        कुणकेरीतील परबवाडी येथे श्री भावईच्या देवघरी तिची उत्सवमूर्ती आहे. हुडोत्सवाच्या दिवशी याठिकाणी तसेच भावईच्या मंदिरातही नवस करणे, नवस फेडणे, ओटी भरणे असे कार्यक्रम होतात. 

        कोरोनाच्या सावटाखाली यावर्षी होळी उत्सव- गतवर्षी ब-याच गावांतील होळी सण उत्साहात साजरा झाला होता. मात्र, शिमगोत्सवाच्या उत्तारार्धात कोरोनाने प्रवेश केल्याने काही गावांतील शिमगोत्सवाची सांगता उत्साहात न होता अगदी साध्या पद्धतीने करण्यात आली होती. दरम्यान, अलिकडे पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने होळी सणाच्या प्रारंभापासून अटी व शर्तींचे कुंपण घालण्यात आले आहे. होळी उत्सव साजरा करताना 50 पेक्षा जास्त लोक जमा होणार नाहीत याची संबंधितांनी दक्षता घ्यावी, उपस्थितांनी मास्क, सामजिक अंतर, सॅनिटायझर, थर्मल गन यांचा वापर करावा, गावात शबय मागणे, खेळे आदी लोककलेचे प्रकार टाळावेत, धुलीवंदन व रंगपंचमीच्यादिवशी रंग उधळण्याचे टाळावेत, मुंबईतील ग्रामस्थांना शक्यतो गावी न येण्याचे आवाहन करावे या सर्वांचे काटेकोर पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

        त्यामुळे यावर्षी होळी सणातील उत्साह माळवणार आहे. बच्चेकंपनींची तर पार निराशाच होणार आहे. होळी सणासारखा मौजमज्जा करता येणारा सण साध्या पद्धतीने करावा लागणार असल्याने सर्वांनाच त्याची हुरहुर वाटणार आहे. तरीही प्रथापरंपरा जपण्यासाठी ग्रामस्थ सहकार्य करतील यात शंकाच नाही.

                                                    –       प्रथमेश गुरव, वेंगुर्ला, 9021070624

 

 

 

This Post Has One Comment

  1. खूप छान लेख. धन्यवाद.

Leave a Reply

Close Menu