स्थानिक पिकांमधून जिल्ह्राची अर्थव्यवस्था मजबूत!

वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठ दापोली, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला व लुपिन फाऊंडेशन, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील दुर्लक्षित औषधी वनस्पती संवर्धनात ग्रामविकास कार्यक्रमांतर्गत सुरंगी, वावडींग, त्रिफळ, वटसोल, पपई, जांभूळ लागवडी बाबत गटचर्चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कोकण कृषी विद्यापिठाचे कुलगुरु डॉ.संजय सावंत, सहयोगी संचालक डॉ.पी.एम.हळदणकर, लुपिनचे योगेश प्रभू, वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राचे डॉ.बी.एन.सावंत, डॉ.एम.पी.सणस, डॉ.व्ही.एस.देसाई, डॉ.एम.एम.गवाणकर, डॉ.एम.बी.दळवी, डॉ.ए.डी.राणे, डॉ.एन.व्ही.गावडे, एम.एन.शेडगे, अग्रोचे जिल्हा प्रतिनिधी एकनाथ पवार, देवगडचे जनार्दन तेली, सदाशिव आळवे आदी उपस्थित होते.

        सुरंगी, वटसोल, पपई, जांभूळ, वावडींग, तिरफळ ही झाडे मोठे उत्पादन देणारी आाहेत. कोेकण कृषी विद्यापिठाने या झाडांचा सर्वप्रकारे अभ्यास करुन सदर झाडांची रोेपे व कलमांचे शेतक-यांना लागवडीबाबत मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. सदर झाडांचे उत्पादन आल्यानंतर प्रोसेसिंग व मार्केटींगही सोप्या रितीने करता येईल, अशा प्रकारचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी कोकण कृषी विद्यापिठाला लुपिन फाऊंडेशनने आर्थिक सहाय्य केले आहे. तसेच शासनाचे कृषी खाते, जिल्हापरिषद, महसूल विभाग या सगळ्यांनी मदत केली आहे. त्यामुळे सदर संकल्पना जिल्ह्रात हळहळू विकसित करण्यात येणार आहे. यामुळे सिंधुदुर्गची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी मदत होईल, असे प्रतिपादन डॉ.संजय सावंत यांनी केले.

 

Leave a Reply

Close Menu