वेंगुर्ल्यात स्पोर्ट टुरिझमची संकल्पना प्रत्यक्षात

वेंगुर्ला-कॅम्प येथील नगरपरिषदेच्या व्यायामशाळा इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सुमारे ४ लाखाच्या निधीतून साकारलेल्या टेबलटेनिस व कॅरम हॉलचा शुभारंभ नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते झाला. यावेळी व्यासपिठावर उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, नगरसेवक सुहास गवंडळकर, धर्मराज कांबळी, शितल आंगचेकर, साक्षी पेडणेकर, श्रेया मयेकर, खेळाडू सुनिल नांदोसकर आदी उपस्थित होते.

      स्वच्छतेत जिल्ह्यात, राज्यात व देशांत अव्वल ठरलेल्या वेंगुर्ला नगरपरिषदेने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला-कॅम्प येथे एकाच ठिकाणी टर्फक्रिकेट, हॉलीबॉल, मॅरेथॉन, स्विमिग तलाव या आऊटडोर खेळाबरोबरच टेबलटेनिस, कॅरम, शुटींगरेंज, बॅडमिंटन, बुद्धीबळ आणि व्यायामशाळेच्या माध्यमातून महिला व पुरुष यांना इनडोअर खेळाची सुविधा प्राप्त करुन दिली आहे. हे सर्व एकाच ठिकाणी असल्याने यातून स्पोर्ट टुरीझमची संकल्पना प्रत्यक्षात आणली असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी केले.

      मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे यांनी नगरपरिषदेने स्वच्छ वेंगुर्ला व सुंदर वेंगुर्लायाची पुर्तता केलेलीच आहे. आता सुदृढ वेंगुर्ल्यासाठीही विविध प्रकारचे खेळ एकाच जागी करुन त्याची सुरुवात केलेली आहे. या विविध खेळांचा याचा लाभ घेऊन राज्यात व देशात खेळाच्या माध्यमातून खेळाडूंनी क्रमांक पटकावून नगरपरीषदेचे नाव रोशन करावे. तसेच खेळातून सशक्त व सुदृढ बनावे असे आवाहन केले. प्रशिक्षक जयराम वायंगणकर, अॅड. शशांक मराठे यांनीही मार्गदर्शन केले. मान्यवरांचे स्वागत नगरसेवक सुहास गवंडळकर, धर्मराज कांबळी व श्रेया मयेकर यांनी तर प्रास्ताविक, सुत्रसंचालन व आभाराचे काम नगरसेवक प्रशांत आपटे यांनी पाहिले.

 

Leave a Reply

Close Menu