सिधुदुर्गचा जावई विशाल भूजबळ यांची निर्मिती

तर कन्या पूर्वा पंडित हिचे कलादिग्दर्शन

आर्ट इज नॉट वन सीज, बट वॉट वन कॅन मेक अदर्स सीया फ्रेंच चित्रकार इद्गर बेगास यांची मध्यवर्ती संकल्पना घेऊन एका अंध मुलाच्या सृजन शक्तीवर प्रकाश टाकणारा अर्जूनहा चित्रपट आहे. अर्जूनला या वेळचा फिल्मफेअरचा उत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कारप्राप्त झाला आहे.

पूर्वा पंडित

                संपूर्ण देशातून निर्माण झालेल्या लघुपटांतून ३० लघु पटांना नामांकन मिळाले होते. त्यातून अर्जुनची निवड झाली. उज्वला कुलकर्णी आणि विशाल भुजबळ यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसेच विशाल भुजबळ हे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते असून ते कणकवलीचे प्रसिद्ध रंगकर्मी तथा वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष वामन पंडित यांचे जावई आहेत. या चित्रपटाचे कलादिग्दर्शन पूर्वा पंडित-भुजबळ यांनी केले आहे. या चित्रपटाला बर्लिन इंडिया फिल्म फेस्टी -व्हल, गोल्डन स्पॅरो इंटरनॅशनल फिल्म  फेस्टीव्हल, गोल्डन बी इंटर नॅशनल चिल्ड्रेन्स फिल्म फेस्टिव्हल अशा आंतरराष्ट्रीय सिने उत्सवाचे पुरस्कार यापूर्वी प्राप्त झाले आहेत. यातील प्रमुख भूमिका करणारा अर्णव अब्दागिरे या अंध मुलाला लघुचित्रपट विभागात बेस्टअॅक्टरचा पुरस्कारही प्राप्त झाला आहे. या चित्रपटाचे  दिग्दर्शन शिवराज वायचळ यांनी केले असून संदिप यादव या लघुपटाचे चलचित्रकार आहेत.

Leave a Reply

Close Menu