स्वमग्नता

          मुलांमध्ये अतिशय विरळ आढळणारा आजार म्हणजे ऑटिझमम्हणजेच स्वमग्नता‘. हा एक प्रकारचा मनोविकार म्हणून ओळखला जातो. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरअसे त्याचे पूर्ण नाव असून सायको न्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंट डिसऑर्डर ह्या प्रकारात तो मोडतो. ही एक गुंतागुंतीची मानसिक स्थिती आहे. नॉर्मल आणि ऑटिस्टिक मुलं यांच्यातील सीमारेषा सुरुवातीला धूसर असते, त्यामुळे मुलांची वाढ, सामान्यपणे सहजपणे होत नाही हे समजणं तसं कठीण असतं. या प्रकारची मुलं आपल्याच विश्वात आणि विचारात रममाण असतात अशी मुलं संवेदनांचे अर्थ लावू शकत नसल्याने त्यावर प्रतिक्रिया देता येत नाही. स्वमग्नताहे या आजाराचे लक्षण आहे; पण हे एक लक्षण म्हणजे पूर्ण विकार असे म्हणता येणार नाही. म्हणूनच या आजाराला गुंतागुंतीची मानसिक स्थिती असे म्हणतात. कारण ऑटिझमहोण्याचे काही एक कारण नाही. म्हणूनच २ एप्रिल हा जागतिक स्वमग्नता जनजागृती दिवसम्हणून पाळला जातो.

      साधारण ५० टक्के मुलं दैनंदिन उपयोगी पडणा-या संवादा -साठी लागणारे शब्दही बोलू शकत नाहीत. त्यांच्या वागण्याचे स्टीरिओटाईप, कंपल्सिव्ह, रिच्युअलिस्टिक, रिस्ट्रीक्टेड अशा ४ प्रकारात वर्गिकरण केले जाते. स्टीरिओटाईप म्हणजे विनाकारण तीच ती अशी निरुपयोगी हालचाल करणे. कंपल्सिव्ह म्हणजे कुणीतरी जबरदस्ती किंवा सक्ती केल्यासारख्या कृती किंवा हालचाली करीत राहणे म्हणजे अशा मुलांना एखादी वस्तू इतक्या विशिष्ट पद्धतीने हवी होते, की त्यात त्यांना बदल चालत नाहीत. त्या परिस्थितीत बदल झाल्यास ती कमालीची अस्वस्थ होतात. रिच्युअलिस्टिकचे उदाहरण म्हणजे रोज तीच तीच कृती करणे उदा. रोज एकच ड्रेस घालणे किंवा एकच प्रकारचे खाणे. रिस्ट्रीक्टेड बिहेविअर मध्ये टिव्हीवरचा एकच एक कार्यक्रम पाहणे या गोष्टी येतात. ज्या मुलांमध्ये ऑटीझम आणि मतिमंदत्व या दोन्ही गोष्टी आढळतात अशी मुलं ब-याचदा आक्रमक होतात.

      ‘ऑटीझमहा आजार निर्माण झालेल्या मुलांना जन्मापासूनच इतरांशी आणि स्वतःशी नात जोडता येत नाही.त्यांच्या लेखी इतर माणसं अदृश्य असतात. ही मुलं फक्त वस्तूंची दखल घेतात. बघणं व ऐकण यापेक्षा स्पर्श करणं, वास घेणं व चव चाखणं अशा अधिक जवळच्या ज्ञानेंद्रियांचाच ती वापर करतात.

      हा आजार ब-याचदा २ ते ३ वर्षापासून ते ५ ते ६ वर्षांपर्यंत लक्षात येऊ शकतो. सौम्य, मध्यम आणि तीव्र अशा लक्षणांच्या तीव्रतेवरुन याचे प्रकार पडतात. संवादामध्ये अडथळा आणि मर्यादित पुनरावृत्ती होणारे वर्तन हे प्रामुख्याने यामध्ये दिसून येते. अशी मुलं फारशी इतरांमध्ये मिसळत नाहीत. त्यांना जवळ घेतलेले आवडत नाही. कुठल्यातरी एका गोष्टीत खूप अधिक रस असतो आणि त्यावर त्यांचं सगळं लक्ष केंद्रीत असतं. अशी मुलं ब-याचदा सतत पाय हलवण, मागेपुढे होत राहणं असं एखादं वर्तन करताना दिसतात. पण आश्चर्य म्हणजे काही मुलं काही ठराविक कोडी सोडवू शकतात तर काहींना मोठी वेळापत्रक पाठ असतात. पण या कौशल्याचा मुलाच्या सर्वांगीण विकासाशी आणि वाढीशी काहीही संबंध नसतो. सिनेमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा श्रेय जातं ते १९८८ मध्ये आलेल्या बॅरी लेविन्सच्या रेनमॅनया चार ऑस्कर मिळवणा-या सिनेमाला. दुस-याची सुखदुःख कळणं, भावना समजून घेणं नक्कल करणं, भाषा शिकणं या गोष्टींचा अभाव या मुलांमध्ये असतो. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाच्या प्रक्रियेत किंवा वागणुकीत खूपच तोचतोचपणा येतो.

      ऑटिझम पूर्ण बरा होण्यासाठी मात्र आज औषध  नाही किवा त्याचे निदान करण्यासाठी कुठलीही चाचणी उपलब्ध नाही. वर्तनाचे निरीक्षण करुनच या आजाराचे निदान केले जाते. लवकर निदान उपचार आणि समुपदेशन याद्वारे या हा मनोविकार नियंत्रित होऊ शकतो. आक्रमता किवा हायपर अॅक्टिव्हिटी यासारखी ऑटिझमची लक्षणे नियंत्रित केली जाऊ शकतात.

      मुलाला ऑटीझम आहे म्हटल्यावर पालक खूप खचून जातात. पण ऑटिस्टिक मुलांच्या पालकांनी स्वतःवर रागावणं, नशिबाला दोष देऊन प्रसंगी मुलाला मारणं यापेक्षा एकत्र येऊन एकमेकांना मदत करण्याची संधी देण्याची आज खूप गरज आहे. इंग्लंडमध्ये १९६२ पहिली ऑटिस्टिक सोसायटीस्थापन झाली. अमेरिकेत स्थापन झालेल्या ऑटिझम सोसायटी ऑफ अमेरिकाया संस्थेत ऑटिस्टिक मुलांच्या पालकांसोबतच तज्ज्ञ विविध उपचार पद्धती आणि परिणामकारकता यांचा आढावा घेतात. नागपूर येथे स्वमग्न मुलांसाठी संवेदनाही शाळा आहे. नाशिक येथे डॉक्टर गौतम कोपीकर यांच्या पुढाकाराने अंकुर लर्निंग सेंटरकार्यरत आहे. पुणे येथे प्रसन्न ऑटिझम ंसेंटर‘,  अहमदनगर येथे व्हिआर स्पीच थेरपीतर बीड येथे स्पीच अँड हिअरींग क्लीनिक आहे.

      अर्थात हा लेख वाचून किवा यावर माहिती घेऊन स्वतःच कुठलेही निदान करणे हे योग्य नाही. यासाठी त्यातील तज्ज्ञ मानसोपचार तज्ज्ञ यांची भेट घेणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Close Menu