‘स्वप्नातला वेंगुर्ला‘ पुस्तक प्रकाशित

‘वेंगुर्ला‘या विषयावर मुक्तपणे लेखन करणारे संजय गोविंद घोगळे यांचे ‘स्वप्नातला वेंगुर्ला‘ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. कोविडच्या संकटामुळे या पुस्तकाचा कोणत्याही प्रकारचा प्रकाशन सोहळा आयोजित न करता श्री. घोगळे यांनी ३१ मार्च २०२१ रोजी हे पुस्तक प्रकाशित झाल्याचे घोषित केले आहे.

       ‘आठवणीतला वेंगुर्ला‘ या पुस्तकानंतर ‘वेंगुर्ला‘ या विषयावरचे श्री.घोगळे यांचे हे दुसरे पुस्तक प्रकाशित झाले आहे. वेंगुर्ला शहराविषयक आठवणींचा त्यांनी विविध सदरातून मनोरंजकपणे आढावा घेतला असून विविध माध्यमातून यापूर्वीच प्रसिध्द झालेल्या लेखांचा संग्रह या पुस्तकाच्या रुपातून वाचकांसमोर आणण्यात आला आहे. सदर पुस्तक हे ‘पीडीएफ‘ स्वरुपात वाचकांसाठी विनामूल्य उपलब्ध असणार आहे. या पुस्तकाच्या काही निवडक प्रिट प्रतीही उपलब्ध आहेत. ज्या उपलब्धततेनुसार वाचनालयासारख्या संस्थांना विनामुल्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यासाठी ८६५५१७८२४७ या व्हाटसअॅप क्रमांकावर संफ साधण्याचे आवाहन श्री. घोगळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Close Menu