दिलीप गिरप यांना सर्वोत्कृष्ट नगराध्यक्ष पुरस्कार

जिनीयस फाऊंडेशन व वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया या दोन संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात सर्वोत्कृष्ट नगराध्यक्ष हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप यांना जाहीर झाला आहे.

      जिनीयस फाऊंडेशन व वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थांनी जगातील स्वच्छता सेवासह सर्व प्रकारच्या शासनाच्या स्वच्छतेचे नियम पाळून जनतेला सेवा दिल्या आहे. अशा सर्व सेवांचे सर्वेक्षण केले गेले. या सर्वेक्षणासाठी महाराष्ट्रासाठी संजय नार्वेकर व सुषमा नार्वेकर यांना नियुक्त केले होते. या टीमने सर्वोत्कृष्ट लोकसेवाकोकण विभागातील कला दालनशुन्य कचरा व्यवस्थापनप्लास्टिकबंदीच्या नियमांचे कडेकोटपालनप्लास्टिकचा वापर करुन टीकावू रस्ते या केलेल्या कामाची पाहणी केली. संस्थकडे सादर केलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रातील वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप यांना वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया या संस्थेचा राष्ट्रीयस्तरावरील सर्वोत्कृष्ट नगराध्यक्ष पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्काराचे स्वरुप मानपत्र व सन्मानचिन्ह असे आहे.

Leave a Reply

Close Menu