बाजारपेठेत पोलीस व नगरपरिषद कर्मचा-यांकडून प्राथमिक आरोग्य तपासणी

वेंगुर्ला तालुक्यात गेल्या ४८ तासात ग्रामीण भागात ३५ तर शहरी भागात ९ असे नव्याने मिळून एकूण ४४ रुग्ण मिळाले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या १८३ वर गेली आहे, अशी माहिती वेंगुर्ला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर सामंत यांनी दिली. दरम्यान, आजपासून बाजारपेठेत फिरणा-या नागरिकांची पोलिस व नगरपरिषद कर्मचा-यांकडून प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

      शनिवारी सकाळी १३ रुग्ण मिळाले. त्यात कामळेवीर-१, खानोली-३, सिद्धार्थनगर-मठ-२, वजराट-२, मठ-वडखोल-१, अणसूर-१, वेंगुर्ले शहर रामघाटरोड-३ यांचा समावेश आहे. तर उशिरा २० रुग्णांचे अहवाल आले. यात कामळेवीर-१, वजराट-२, जोसोली-१२, होडावडे- ५ यांचा समावेश आहे. रविवारी वेंगुर्ल शहरात ६ तर खवणे- पागेरे या ग्रामीण भागात-२ असे ८ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील ३५, तर शहरी भागातील ९ रुग्ण आहेत. यात भटवाडी-३, गाडीअड्डा-१, किनळणेवाडी ५ असे एकूण ४४ रूग्ण नवीन सापडले आहेत. तालुक्यातील रुग्णांची संख्या ७८० एवढी झाली असून त्यातील ५८६ रुग्ण बरे झाले आहेत. १४ जणांचा मृत्यू झाला आहे. यात शहरी भागातील २३०, तर ग्रामीण भागातील ५५३ एवढ्या रुग्णांचा समावेश आहे. शहरांत ६२ तर ग्रामीण भागात १२१ असे १८३ रूग्ण सक्रिय आहेत. त्यापैकी कोरोना केअर सेंटर मध्ये ३७, विलगीकरणात ११३, शिरोडा उपजिल्हा रूग्णालयात १२, ओरोस येथे १६, तर खाजगी हॉस्पीटलमध्ये पाचजण आहेत.

      वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता आज पासून वेंगुर्ला शहरात अनावश्यक फिरणा-यांची पोलीस व नगरपरिषद कर्मचारी यांच्याकडून थर्मल गन च्या व ऑक्सिमिटरच्या सहाय्याने प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामुळे आज बाजारपेठेत नागरिकांची नेहमीपेक्षा कमी वर्दळ पाहण्यास मिळाली.

Leave a Reply

Close Menu