ग्राहकांना हापूस आंबा ऑनलाईन खरेदीची सुविधा

हापूस आंबा ग्राहकांना ऑनलाईन पोर्टलद्वारे आपली मागणी थेट शेतक-यांकडे  नोंदविण्यासाठी कृषी पणन मंडळाने सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी संकेतस्थळावरील लिकद्वारे ग्राहकांना आंबा खरेदी करता येणार आहे. त्यामुळे या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी पणन मंडळामार्फत करण्यात आले आहे.

    महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे दरवर्षी कोकणातील हापूस आंबा शहरातील ग्राहकांना थेट कोकणातील उत्पादकांद्वारे उपलब्ध व्हावा यासाठी आंबा महोत्सवाचे आयोजन केले जाते. कोरोना विषाणू प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर आंबा महोत्सवाचे आयोजन करणे अद्याप शक्य झालेले नाही. कोकणातील आंबा उत्पादकांना विक्रीसाठी शहरात यावे लागू नये तसेच शहरातील ग्राहकांनाही घराबाहेर किवा सोसायटीबाहेर पडावे लागू नये याकरीता उत्पादक व ग्राहक या दोघांनाही ऑनलाईन पोर्टलद्वारे आंबा खरेदी-विक्रीची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्रराज्य कृषी पणन मंडळाच्या www.msamb.com या संकेतस्थळावरील buyer seller information लिकद्वारे अथवा bs.msamb.com या लिकद्वारे खरेदीदारांना नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. कृषी पणन मंडळाने सदर पोर्टलवर कोकणातील हापूस आंबा उत्पादकांचची नोंदणी सुरु केली आहे. त्यामध्ये आंबा उत्पादकांचे नाव, संफ क्रमांक, आंबा उपलब्ध तपशील आदी माहिती पोर्टलवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुणे, मुंबई तसेच इतर शहरातील वैयक्तिक ग्राहक अथवा सहकारी गृहनिर्माण संस्था इत्यादी सर्वांना त्याची मागणी पोर्टलवर नोंदविता येईल किवा विशिष्ट आंबा उत्पादकांशी संफ करता येऊ शकेल व आंबा खरेदीबाबत तातडीने कार्यवाही करुन शहरातील ग्राहकांना त्यांच्या घरी आंबा पोहोच करु शकतील. आंबा खरेदी करिता किमान मर्यादा १०० डझन असणार आहे. कृषी पणन मंडळाकडून कोकणातील दर्जेदार व नैसर्गिकरित्या पिकवलेला हापूस आंबा शहरातील ग्राहकांना थेटउत्पादकांकडून उपलब्ध व्हावा यासाठी आंबा उत्पादकांनी पोर्टलवर विक्रेता म्हणून व ग्राहकांची कृषी पणन मंडळाचे पोर्टलवर खरेदी म्हणून नोंदणी करावी व उपलब्ध आंबा अथवा आंब्याची मागणी नोंदवावी असे आवाहन कृषी पणन मंडळामार्फत करण्यात येत आहे.

 

Leave a Reply

Close Menu