वेंगुर्ल्यातील महिलेचा प्रामाणिकपणा

वेंगुर्ला, कॅम्प-पत्र्याच्या पुलानजीक मंगळवारी सायंकाळी ७ वाजता सापडलेले पैशाचे पाकिट राऊळवाडा येथील ६६ वर्षीय दिपाली दिलीप मळेकर हिने वेंगुर्ला पोलीस ठाण्यात जमा केले. सदरच्या पाकिटात रोख रक्कम २ हजार व ए.टी.एम. कार्ड, आधरकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन, गाडीचे आर.सी.बुक आढळून आले. त्यावरुन त्या पाकिटाच्या मालकाचा शोध घेत वेतोरे-वरचीवाडी येथील समीर आबा गावडे यांना वेंगुर्ला पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले. त्यांच्याकडे पाकिटातील वस्तू संदर्भात सर्व चौकशी अंती पोलीस निरीक्षक तानाजी मोरे व पोलीस उपनिरीक्षक रुपाली गोरड, पोलीस सुरेश पाटील व त्या महिलेचे पती दिलीप मळेकर यांच्या उपस्थितीत सदरचे पाकीट पोलीस निरीक्षक यांच्या सुचनेनुसार दिपाली मळेकर यांनी त्यांना परत केले.

 

This Post Has 2 Comments

  1. प्रामाणिकपणाचीनोंद ईश्वर दरबारी होत असते आणि त्याचे योग्य फळ माणसाला मिळत असते. दुसरे म्हणजे कष्टाने व प्रामाणिकपणे मिळवलेली संपत्ती हरवली तरी पुन्हा मिळते. नियतीची ती योजना असते.

  2. अशी प्रामाणिक माणसं अजूनही या कलीयुगात आहेत त्यामुळे चांगुलपणा म्हणजे काय ते नवीन पिढीलाही समजते
    त्या बाईंना प्रणाम, सदैव सुख लाभो ही मनापासून प्रार्थना🙏

Leave a Reply

Close Menu