वेंगुर्ल्यात १०,२६१ जणांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस

वेंगुर्ला तालुक्यासाठी २५ एप्रिलपर्यंत कोविशिल्डच्या ५८८३ व कोव्हॅक्सिनच्या ४३७८ मिळून १० हजार २६१ लसी प्राप्त झाल्या. त्याचा १० हजार २६१ व्यक्तींनी लाभ घेतला असल्याची माहिती वेंगुर्ला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर-सामंत यांनी दिली. तालुक्यात आतापर्यंत एकूण ९०९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ७२४ रुग्ण बरे होऊन घरी परतले तर यातील १८५ रुग्ण सक्रिय आहेत.

Leave a Reply

Close Menu