मोफत शिवभोजन थाळीचा शुभारंभ


     कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासना मार्फत करण्यात आलेल्यालॉकडाऊनच्या काळात परप्रांतीय मजुर व निराधार यांच्या खाण्या-जेवणाची व्यवस्था व्हावी, या उद्देशाने राज्यातील आघाडी शासनामार्फत प्रत्येक जिल्ह्यासह तालुक्यात शिवभोजन थाळी राबविण्यात आलेली आहे. मात्र, वेंगुर्ला तालुक्यात सदर शिवभोजन थाळी चालू करण्याकरीता मक्त्यासाठी नोंदणी केलेली नसल्याने अद्याप शासकीय शिवभोजन थाळी चालू झालेली नाही. त्यामुळे परप्रांतीय मजूर व निराधारांना शासनाच्या कोरोना काळातील लढ्यामुळे उपासमारीची वेळ होऊ नये, त्याकरीता खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत व आमदार दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ला तालुका शिवसेनाप्रमुख यशवंत परब यांनी मतदार संघाचे संफ प्रमुख शैलेश परब यांच्या सहकार्याने वेंगुर्ला तालुक्यासाठी दररोज १०० ताटांची शिवभोजन थाळी ४ मे पासून सुंदर भाटले येथील शिवसेना संफ कार्यालयात सुरु केली आहे. संफ प्रमुख शैलेश परब यांनी या उपक्रमास भेट दिली.

      तत्पूर्वी, शिवभोजन थाळीवरुन भाजप-शिवसेना यांच्यात स्थानिक पातळीवर टीकेचे राजकारण झाले होते. त्यामुळे या शिवभोजन थाळीवर सर्वांचे लक्ष लागून होते.

 

Leave a Reply

Close Menu