सिधू स्वाध्यायसाठी भाडेकराराने जागा

            मुंबई विद्यापीठामार्फत सिंधू स्वाध्यायहा अभ्यासक्रम राबविण्यासाठी वेंगुर्ला शहरात इमारत उभारण्यात येणार आहे. परंतु, सदरची इमारत पूर्णत्वास येईपर्यंत नाममात्र भाडेकराराने जागा मिळावी म्हणून मुंबई विद्यापीठाने वेंगुर्ला नगरपरिषदेस पत्राद्वारे विनंती केली होती. या विषयावर निर्णय घेण्यासाठी १२ मे रोजी वेंगुर्ला नगरपरिषदेची ऑनलाईन पद्धतीने विशेष सभा घेण्यात आली.या सभेत न.प.चे कॅम्प येथील पर्यटन सुविधा केंद्र (निसर्ग इमारत) शैक्षणिक कारणास्तव तात्पुरत्या कालावधीसाठी नाममात्र भाडेकराराने देण्याचा ठराव करण्यात आला. तसेच जागा भाडेकरारावर उपलब्ध करुन देताना जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीमार्फत सदर इमारतीचे भाडे व अधिमूल्य रक्कम निश्चित करून देण्यात आलेले आहे. याच दराने सदर इमारत मुंबई विद्यापीठास भाडेकराराने देण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच या ठरावावर डीएमए आणि जिल्हाधिकारी यांच मार्गदर्शन घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाही करावी असे ठरविण्यात आले.

Leave a Reply

Close Menu