स्थायी व अस्थायी कर्मचा-यांना विमा संरक्षण

वेंगुर्ला न.प.ची सर्वसाधारण सभा ११ मे रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. यात नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, नगरसेवक साक्षी पेडणेकर, प्रशांत आपटे, शीतल आंगचेकर, कृतिका कुबल, विधाता सावंत, महेश डिचोलकर, स्नेहल खोबरेकर, श्रेया मयेकर, सुमन निकम, धर्मराज कांबळी, विनायक गवंडळकर, पूनम जाधव, आत्माराम सोकटे, मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे व इतर अधिकारी सहभागी झाले होते. न.प.चे स्थायी व अस्थायी कर्मचारी कोरोना काळात अत्यावश्यक व जोखमीचे काम करत असल्यामुळे त्यांना १ वर्षासाठी विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेऊन यासाठी येणा-या खर्चास मंजूरीही देण्यात आली. न.प.हद्दीतील वाहतुकीची कोंडी आणि अपघात टाळण्याच्या दृष्टीने हॉस्पिटल नाका, गाडीअड्डा नाका, दाभोली नाका, पिराचा दर्गा व कॅम्प कॉर्नर अशा धोकादायक ठिकाणी बर्हिगोल आरसे बसविण्यासाठी मंजूरी देण्यात आली. वेंगुर्ला बस स्थानक येथे अस्तित्वात असलेले शौचालय तेथील आगार व्यवस्थापकांच्या संमतीने दुरुस्त करण्यासाठी येणा-या खर्चास मंजूरी दिली. तर न.प.च्या मालकीच्या सर्व मालमत्तांवर सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी अंदाजपत्रक तयार करुन सदर यंत्रणा लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे ठरविण्यात आले.

Leave a Reply

Close Menu