►तालुक्यात वादळी वा-याने पडझड

ताऊकती‘ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सिधुदुर्ग जिल्ह्यामध्ये १४ मे पासून सर्तकतेचा इशारा दिला होता. वेंगुर्ला तालुक्यात १४ मे च्या सायंकाळपासून विजांचा लखलखाट व ढगांचा गडगडाट होत होता. मात्रमध्यरात्री मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. यातच आलेल्या वादळी वा-याने झाडे पडण्याचे प्रकार घडले. वेंगुर्ला शहरामध्ये बॅ.खर्डेकर रोडवरील पुरुषोत्तम मडकईकर यांच्या घरावर नजिकचे आंब्याचे झाड पडून घरातील साहित्याचे नुकसान झाले. तर याच घरालागून असलेल्या राऊळ फोटो स्टुडिओवरही सदरचे झाड पडल्याने छप्पराचे तसेच पावसाचे पाणी आत शिरल्याने संगणकप्रिटर व इलेक्ट्राॅनिक साहित्यासह सुमारे ६० हजारांचे नुकसान झाले. दरम्यानआज सकाळी वेंगुर्ला तलाठी डी.बी.गोरडकोतवाल मालणकर यांनी घटनास्थळी दाखल होत नुकसानीची पहाणी केली.

      उर्वरित घटनांमध्ये दाभोली नाका येथील हकीम नर्सरीत झाडांच्या फांद्या पडून विद्युत वाहिन्या तुटल्यामठ-टाकयेवाडी येथील सुनिता सावंत यांच्या घरावर झाड पडून नुकसान तर रावदस येथील रमेश बाळकृष्ण आंबोडसकर यांच्या घरातील विद्युत मीटर व टीव्ही विजेच्या धक्क्याने जळून सुमारे १५ हजारांचे नुकसान झाले आहे.

      वेंगुर्ला-मांडवी खाडीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने खाडी किनारी राहणा-या नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मच्छिमारांनी आपल्या नौका खाडीत आश्रयाला आणल्या आहेत. मांडवी खाडीतील पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ होत आहे. तर बंदर परिसरात जोरदार लाटा उसळत आहेत.

      बंदर रोड येथे रोडला लागून संरक्षक भिंत बांधण्याचे काम चालू असून या कामात या उधाणामुळे व्यक्तय येत आहे. 

विद्युत पुरवठा खंडित

      शुक्रवारी मध्यरात्रीच्या वादळी वा-यानंतर शहरासह पंचक्रोशीतील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास शहरातील काही ठिकाणी विद्युत पुरवठा सुरळीत झाला. तर काही ठिकाणी झालेल्या पडझडीमुळे विद्युत वाहिन्या तुटल्याने शुक्रवारी उशिरापर्यंत त्या जोडण्याचे काम सुरु होते.

Leave a Reply

Close Menu