चक्रीवादळात निवती रॉकवर धोक्यात सापडलेल्या दोघांना वाचविले

निवती रॉकवरील ऑनड्युटीवर असलेल्या कर्मचा-यांना तौक्ते चक्रीवादळामुळे धोका असल्याची कल्पना वेंगुर्ला दिपगृहावरील इनचार्ज स्टीव्हन सुवआरीस यांनी गोव्यातील तटरक्षक दलास कळविल्यानुसार १८ मे रोजी दुपारी हेलिकॉप्टरने त्या दोन कर्मचा-यांना गोव्यात नेण्यात आले.

      निवती दीपस्तंभाबरोबरच येथील कार्यालयाचे व साठा केलेल्या अन्न धान्याचे चक्रीवादळात नुकसान झाले आहे. गोवा येथील कोस्टल डिपार्टमेंटअधिकारी व डायरेक्टर यांनीही वेंगुर्ला दिपगृहावरील अधिका-यांनी दिली होती. त्यानुसार गोवा कोस्टलने १८ मे रोजी सकाळी ११ वाजता हेलीकॉप्टर सोडले ते निवती रॉकवर डुटीवर असलेल्या दोन्ही कर्मचा-यांना घेऊन दुपारी १.३० वाजता परत गोव्यात पोहोचले. त्या दोन्ही कर्मचा-यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

      निवती रॉकवर ड्युटीवर असलेले कर्मचारी राजन वाल्मिकी (५६) व विशाल भगंत सारंग (५४) हे सुरक्षित असल्याचे तसेच निवती रॉकवरील कार्यालयाची वादळाने झालेली दुर्दशासर्व फुटून व फूटून गेलेली तावदानेउडून गेलेले छप्परअन्नधान्य वा-याने उडून तसेच भिजल्याने झालेल्या नुकसानी झाली असल्याची माहिती वेंगुर्ला लाईट हाऊस इनचार्ज स्टिवन सुवआरीस यांनी दिली.

Leave a Reply

Close Menu