►वेंगुर्ला येथे रुग्णाला घरीच ऑक्सिजन सुविधा

वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावातील रहिवासी आणि सध्या वेंगुर्ला मीना पार्क येथे राहणारे चंद्रकांत भगवान पालव यांना आमदार नितेश राणे यांच्या सहकार्यातून त्यांच्या घरीच ऑक्सिजन सुविधा पुरविण्यात आली आहे. त्यांच्या या सहकार्याबाबत पालव कुटुंबीयांनी ऋण व्यक्त केले आहेत.

      सोशल मीडियावर आमदार नितेश राणे यांच्याकडून ऑक्सीजन सिलेंडरची सोय होईल असे समजताच त्यांना संफ केला असता तात्काळ रात्री महेश बागवे यांच्या समवेत कणकवली येथून वेंगुर्ला येथे ऑक्सीजन सिलेंडर पाठवण्यात आला. वेळेत ऑक्सिजनची सोय झाल्याने चंद्रकांत पालव यांना प्राथमिक उपचारांमध्ये फायदा झाला. दरम्यानचंद्रकांत पालव यांना मुंबई येथे अधिक उपचारासाठी आणले आहे. त्यांची प्रकृती आता सुधारत असल्याचे पालव यांचे भाऊ रमाकांत पालवपुतणे अजिंक्य पालवधनंजय पालवअमित पालव आणि धनेश पालव यांनी सांगितले. तसेच आमदार नितेश राणे यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Close Menu