बाजारात फिरणाऱ्या १५४ जणांची रॅपिड टेस्ट ; एक जण पॉझिटिव्ह

वेंगुर्लेत कोरोना संसर्ग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करून विनाकारण बाहेर फिरणाऱ्या तसेच विनामास्क असलेल्या १५४ नागरिकांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली त्यामध्ये १ जण पॉझिटिव्ह आला आहे. या धडक कार्यवाहीने विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले.

         सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढती संख्या वाढत असून जिल्हा रेड झोन मध्ये आला आहे. संसर्ग पूर्णत: आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाचे विविध उपाययोजना सुरू आहेत.जिल्हाधिकारी यांनी विनाकारण शहरात फिरणार्याची रॅपिड अँटिजेन चाचणी घेण्याचे आदेश मिळताच आज गुरुवार २७ रोजी दुपारच्या सत्रात रामेश्वर मंदिर नजीक व वेंगुर्ला नगरपरिषद कडे वेंगुर्ला नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ अमितकुमार सोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग,वेंगुर्ला पोलीस व वेंगुर्ला नगरपरिषद यांनी भरारी पथकाद्वारे संयुक्तिकरित्या विनाकारण शहरात फिरणाऱ्यांची रॅपिड अँटिजेन चाचणी घेण्यात आली. शहरात दोन्ही भरारी पथकाद्वारे १५४ व्यक्तींची रॅपिड अँटिजेन चाचणी घेण्यात आली. त्यातील एक जण वगळता अन्य रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास टाकला. मात्र या कार्यवाहीने विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांचे व कामानिमित्त बाहेर पडलेल्यांचे धाबे दणाणले. या भरारी पथकात वेंगुर्ला नगरपरिषद कर्मचारी, पोलीस कर्मचारी व आरोग्य विभागाचे कर्मचारी यांचा समावेश होता. तर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून जिल्हा रेड झोन मध्ये आला त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडू नका असे आवाहन वेंगुर्ला नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे यांनी केले आहे.

This Post Has One Comment

  1. अकारण फिरणार्यावर कारवाई केली हे उत्तम झाले. पुढच्यावेळी हेच तरुण सांपडले तर त्यांच्याकडून जबर दंड वसूल करावा.

Leave a Reply

Close Menu