१४५व्या वर्धापनदिनी कोरोना योद्ध्यांचा गौरव

वेंगुर्ला नगरपरिषदेचा १४५वा वर्धापन दिन सोहळा नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात कोरोना आदर्श आचारसंहितेचे पालन करुन मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत साधेपणाने पार पाडला. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरपउपनगराध्यक्ष अस्मिता राऊळमुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगेसुहास गवंडळकरमहेश डिचोलकरधर्मराज कांबळीविधाता सावंतश्रेया मयेकरसाक्षी पेडणेकरकृतिका कुबलस्नेहल खोबरेकर व अधिकारीकर्मचारी उपस्थित होते.

      सदर वर्धापनदिनाचे औचित्य साधून नगरपरिषदेकरिता सेवा बजावणा-या अजित गिरपराजन वेंगुर्लेकर व गणपत जाधव यांचा गौरव करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच कोरोना काळात कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींचे मृतदेह दहन करण्याचे महत्वपुर्ण कार्य करणा-या अनिल वेंगुर्लेकरहेमंत चव्हाण,  पंकज पाटणकर व अक्षय तेरेखोलकर यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे यांनी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या इतिहासाचा आपण भागीदार झाल्याचे भाग्य आपणास लाभल्याचे सांगितले. तर नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी नगरपरिषदेच्या प्रगतीमध्ये सहभागी असणा-या सर्व पदाधिकारीअधिकारी व कर्मचा-यांचे कौतुक केले. तसेच वेंगुर्ला नगरपरिषदेचा येणारा प्रत्येक वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करावा असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक प्रशांत आपटे यांनी केले.

Leave a Reply

Close Menu