ऑक्सिजन वॉर्डचा शुभांरभ

कॅम्प येथील मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृह येथे वेंगुर्ला न.प.अर्थ सहाय्यित कोव्हीड ऑक्सिजन वॉर्डचा शुभारंभ भाजपाकडून प्राप्त झालेले ५ ऑक्सिजन कॉन्स्टेटर वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी सामंत यांच्याकडे भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते प्रदान करुन करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी नगरपरिषदेमार्फत टेंडर पद्धतीने प्राप्त झालेले १४ जॅम्बो ऑक्सिजन सिलेंडरही याचवेळी प्रदान केले.

      यावेळी मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे, भाजपाचे शरद चव्हाण, प्रसन्ना देसाई, नगरसेवक प्रशांत आपटे, धर्मराज कांबळी, श्रेया मयेकर, नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल, डॉ.रिचर्ड फर्नांडिस व कोव्हीड सेंटरचा स्टाफ आदी उपस्थित होते. नगराध्यक्ष दिलीप गिरप व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी प्रदेश भाजपाकडे केलेल्या मागणीनुसार ऑक्सीजनची कमतरता जाणून घेऊन प्रसाद लाड यांनी नगरपरिषदेस हे ५ ऑक्सीजन कॉन्सटेटर पाठविले आहे.

Leave a Reply

Close Menu