केंद्रीय पाहणी पथकाकडून दाभोली व नवाबाग येथील नुकसानीची पाहणी

तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची पहाणी आणि स्थानिक प्रशासनाकडून केलेल्या पंचनाम्याची पडताळणी करण्यासाठी केंद्रीय पाहाणी पथकाने आज सोमवारी वेंगुर्ल्यात दौरा केला. यावेळी त्यांनी नवाबाग येथील मच्छीमारांचे झालेले नुकसान आणि दाभोली येथील माड-पोफळी यांचे झालेले नुकसान याची पाहणी केली.

      वेंगुर्ला तालुक्याच्या किनारपट्टी भागाला या चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला. यावेळी झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आले होते. आंतरराज्य संक्षिप्त सचिवालय सल्लागार तथा पथक प्रमुख अशोक कुमार परमार यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थ मंत्रालयचे संचालक अभय कुमार, केंद्रीय विद्युत प्राधिकरण अधीक्षक अभियंता जे.के.राठोड आणि कृषी मंत्रालय नागपुरचे संचालक आर.पी.सिंग या पथकाने दाभोली येथील संतोष गोखले यांच्या फोपळी व माड बागायतीचे झालेल्या नुकसानीची या पथकाने पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, उपविभागीय कृषी अधिकारी कांबळे, तालुका कृषी अधिकारी हर्षदा गुंड, नायब तहसीलदार लक्ष्मण फोवकांडे आदींसह अधिकारी उपस्थित होते.

      तर रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्रालय, कार्यकारी अभियंता देवेंद्र चापेकर व मत्स्यपालज्ञान शास्त्रज्ञ, मत्स्य विभागाचे अशोक कदम या पथकाने नवाबाग येथील मच्छीमारांच्या नुकसानीची पाहणी केली. येथे मचछीमारांची जाळी तूटून झालेले नुकसान तसेच रोहिदास केळुसकर यांची एक बोट फुटून झालेला नुकसानीची त्यांनी पहाणी केली.

      यावेळी स्थानिक फिशरीजचे अधिकारी रविद्र मालवणकर, उभादांडा तलाठी वजराटकर, आडारी तलाठी आंदुर्लेकर, उभादांडा कृषी सहाय्यक श्रद्धा तांडेल, आडारी कृषी सहाय्यक प्रसाद खडपकर, पोलिस पाटील विजय नार्वेकर आदी उपस्थित होते. यावेळी स्थानिक मच्छिमार अशोक खराडे, गणपत केळुस्कर, दादा केळुसकर, रोहीदास केळुसकर यांच्यासह अन्य मच्छिमारांनी आपल्या नुकसानीची माहिती दिली. तसेच दरवर्षी नवाबाग खाडीच्या मुखापाशी साचलेल्या गाळामुळे मच्छीमारांचे कसे नुकसान होते याचे प्रत्यक्ष दाखवून या समितीला माहिती दिली. यासाठी शासनाने मंजूर केलेल्या येथील प्रकल्पाला पर्यावरणाचा दाखला लवकरात लवकर मिळवून द्यावा अशी मागणी मच्छीमार बांधवांनी पथकाकडे केली.

Leave a Reply

Close Menu