आठवणीतलो जैतिर!

    आंबे काढता काढता पोरानी आरड घातली, ‘गे आये, गे आये जैतीर येता हा पुढल्या महिन्यात. आमका नये कपडे होये.तितक्यात बापाशिन बायलेर तिरकी नजर टाकल्यान…तशी पोरा गप वगी झाली.

     आम्ही घराकडे इलो. हात-पाय धुतले आणि अभ्यासाक बसलो. को-या  चायचो घोट घेता घेता बापाशीन माझ्या आवशिक सांगला, ‘हयते काजी सुकयलेत. ते वेंगुर्ल्याच्या बाजाराक घेवन जा फाल्या आणि बघ पोरांका काय होया ता घेवन ये.आवशिन, ‘होय जातय हुनान सांगलेन आणि इचार करित भाकरे भाजूक बसली.कारण तिकाच फक्त माहीत होता घर-संसार आणि पोरांची शिक्षणा आमचो बापूस कसो चलय होतो. पण वर्षाचो ह्यो जैतीर सण असोच दवडुचो नाय. कारण आमचो देव ११ दिवस मांडार बसता आणी वर्षातसून फक्त एकदाच येता.

      बापाशीचे शब्द आयकले आणि आम्ही पोरा पोटात उकळी इल्यागत काळोखात खोलयेत नाचाक लागलव. कारण बापाशिन बघला तर मारतलो ह्या आमका माहीत होता. आमची पोरांची कुजबुज आसायची, ‘मिया ह्यो रंग घेतलय, मिया तो रंग घेतलय…असा करीत करीत निज कधी लागा कळा नाय…परत सकाळी फाटेक उठलव काय तेच गजाली सुरु.

     आवस आमची सकाळीच उठान बाजाराक जाय आणी सगळो बाजार घेवन येय. पण आमचो लक्ष फक्त नया कपड्यार असायचो. नये कपडे घालून मांडार मिरवाक गावताला ह्या खुशीत खावकाकडे लक्षच नसायचो आणि मगे आतुरता असायची ती जैतीर कधी येता तेचि. नविन आणलेले कपडे आम्ही चार-चार दिसांनी परत परत काढुन बघू..असो येडे पणा असायचो तेव्हा.

      जैतीर यवक फक्त दोन दिवस रवले काय आमचो बापुस केळ्याचो घड पिकत घाली. खुप केळी खाव तेव्हा आम्ही प्वाट फुगासर. फाल्या जैतीर तर आज रात्री पिकलेली केळी चुन्याची बोटा लावन टोपलेत भरुन इकूसाठी बापूस ठेय. सकाळ झाली रे झाली की चाफ्यार चढान सगळी चाफी काढी. ही ढिगभर चाफी आणि तेचो वास अख्या घरात परमाळा. बापूस तेव्हा आमका १०-१० रुपये जैतीराच्या खर्चाक दिय. ते दहा रुपये म्हणजे आमका दहा हजार दिल्या सारखे वाटत. तेचा काय घेव आणि काय नको असा जाय. खूप मोठो श्रीमंत असल्याचो भास होय तेव्हा आमका.

      जैतिराचो पहिलो ढोल वाजाक लागलो काय गावाच्या मांडावरसून ते वर आमच्या वाघेरीच्या डोंगरापर्यंत तेचो आवाज येय. आवाज इलो रे इलो काय आमची नुस्ती आरड आसायची चला चला देव मांडार इलो उशिर झाले.मगे आम्ही जेयल्या न जेयल्या सारखी करु आणि उडये मारीत जैतिराच्या मांडार हजर. पाय भाजत मातयेच्या रस्त्यात. आनंदाच्याभरात ता जाणवा पण नाय.

      मांडार इलव काय आम्ही पयली पिंपळावर जाव. कारण, आमची आई चाफी आणि केळी इकुक थय बसा. तिका भेटलव काय देवळात जावन जैतिराच्या पायावर नतमस्तक होव. देवाचा पाषाण रुपी साजिरा रुप बघून मनाचा खुप समाधान हो. त्या पाषाणाकडे बघून पंढरीचो विठोबा साक्षात उभो आसा की काय असो भास होय. बोलके डोळे, हातात तलवार, सोबत असलेलो घोडो आणी त्याच्या गळ्यात घातलेले हार त्यात शेवंती, आबोली, चाफी किती ते लाड माझ्या जैतिराचे. पाषाणाच्या सभोवती तांदूळ, फुला, केळी आणि अगरबत्तीची रास असायची.

      देवाचा दर्शन झाला रे झाला की आम्ही सगळी दुकाना फिरान काढू. बापाशीन दिलेल्या दहा रुपयात आम्ही चाय, थंड आणि बारीक बारीक सामान घेव. कधी कधी पावणे सुद्धा आमका सरबत, पेप्सी दियत. सगळी दुकाना चार चार फिरान काढू. शाळेतले मित्रमैत्रिणी पण भेटत. सगळा फिरान झाला काय आम्ही परत मांडार येव. गर्दी खूप असल्यामुळे गर्देत आमका रंगीबेरंगी साडये नेसयलेली रामेश्वर, रवळनाथ आणि सातेरीची तरंगा गोल गोल फिरताना दिसत. त्या सातेरीक घातलेली नथ, आबोली-चाफ्याची वेणी आणि नेसवलेली हिरवी गर्द साडी. तरांग फिरताना तिचो चेहरो आपल्याकडे बघता असा वाटा. माझे भक्त, माझी पोरा, हेंका गोल गोल फिरान ती तिनय तरंगा आशिर्वाद देयत.

      जैतीर देवाचा रुपडा मानकरी मांडार खेळवताना बघुक खूपच मजा यायची. पण उंची कमी असल्यामुळे आमका ता दिसा नाय. मग आम्ही टाचे वर करुन बघू आणि पुढे पुढे जाव. तेव्हा मोठी माणसा आमका भय घालित, ‘अरे, देव तलवार फिरयता. लागात तुमका. परती रवा.मग निराश होऊन आम्ही मागे येव. देव मांडार नाचलो की सगळे चाळे उठय. ह्या सगळा बघुक ही अफाट गर्दी. पण मिया कधीच माझ्या आयुष्यात आयकाक नाय की, कोण पडलो? कोण हरावलो? चोरी झाली त्या गर्देत. कारण देवच तारण करी आमचो सगळ्यांचा. देवाची ही कामा झाली काय देव आमका सगळ्यांका, माहेवाशीणींका,पोरा-बाळांक, म्हातारे-कोता-यांका आशिर्वाद दिय आणि धावत धावत सांजे घराक जाय. असो ह्यो आमचो उत्सव ११ दिवसाचो कवळासाची सांगता करुन संपा.

      कवळास येवचो आसलो की आम्ही भूता बघूक जाव. त्यांका देव घरात ठेयलेलि आसत. खूप किंकाळे घालीत. मगे आमची पोरांची चर्चा आसायची, ‘ह्या खूप मोठा भयंकर आसा भूत. देवाचे ढोल वाजाक लागले की त्यांच्या आंगात येय, माडांर त्या भुतांका हाडली रे हाडली की देव तलवार फिरय. त्या तलवारीचो मार बसलो की त्या कूडीची त्या भूतापासुन सुटका होय. देवाची सगळी कामा झाली की देव उठयलेले चाळे परत वर्षासाठी बसय. ह्या दिवसांत इलेले पावणे आणि गावातील लोक हेंनी वेशीबाहेर जाव नये अशी प्रथा आसा. माहेरवाशीणी कोंबे आणीत मग रात्री सागोती आसायची.

      असो माझो ह्यो आठवणीतलो जैतीर माका आजय आठवता. पण देवा जैतिरा २०२० इला आणि कोरोनामुळे तुझी ७०० वर्षाची परंपरा खंडित झाली. सकाळीच वाजणारे ढोल माझ्या कानार नाय येवक, कोणीच कपडे खरेदी करुक नाय, केळीचे घड केळीवरच पिकले, चाफी झाडावरच झडली. त्या पाकळ्यांचो सडो बघून जीव कासाविस झालो. पॅ..पॅ… वाजणारी पेपारी…फुगेवाले आणि खेळणी..भजिचो दरवाळनारो वास यंदा नाय बघुक गावाचो रे, गर्दीत मित्रमंडळी नाय भेटाची, माहेरवाशीण कोंबे घेऊन नाय येवची, पावण्या-रावन्या नाय यवची..माझा घर यंदा खाली खाली आसा रे. तुझा पाषाण डोळे भरुन नाय बघुक गावाचा. तुका प्वॉट भरुन चाफ्याची आणी आबोलिची फुला नाय घालूक गावाची. अगरबत्तीचो वास आणि ती फुलांची आरास नाय बघुक गावाची. लेकरांका भेटाक तू अनवाणी आमच्या घराकडे येयस. वाटेतलो पाचाळो सुधा तुझी वाट बघता हा. यंदा खीर, गुळ आणि खोब-याचो प्रसाद तुका दाखविन नक्की. तुझी आवडती चाफ्याची फुला तुका घराकडसूनच वाहिन. ती पावन करुन घे आणि ह्या संकट दुर कर. आम्ही तुझी पुढल्या वरसा आतुरतेने वाट बघतव…ये परत.         

– सूर्यकांत आनंद गोळम,

तुळस-वाघेरीवाडी, मोबा.८१०८५०७०७४

Leave a Reply

Close Menu