“सिंधुस्वाध्याय’ अभ्यासक्रमाकरीता सामंजस्य करार करावा-डॉ.पेडणेकर

रोजगाराच्या अनेक संधी विद्याथ्र्यांपर्यंत पोहचविण्यासाठी वेंगुर्ला येथे “सिंधुस्वाध्याय’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उपकेंद्र होणार आहे. यासाठी जमिनीसंदर्भात येथील फळ संशोधन केंद्रात बैठक पार पडली. यवेळी मुंबई विद्यापिठाचे कुलगुरु डॉ.सुहास पेडणेकर, आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, तहसीलदार प्रविण लोकरे, फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ.बी.एन.सावंत, भूमी अभिलेखचे उपअधीक्षक तुपकर, पोलीस निरीक्षक तानाजी मोरे, शिवसेना जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन वालावलकर, उपजिल्हाप्रमुख सुनील डुबळे, शहर प्रमुख अजित राऊळ, प्रकाश गडेकर, सचिन गडेकर, नगरसेवक विधाता सावंत, प्रकाश डिचोलकर, कृतिका कुबल, सुमन निकम, स्नेहल खोबरेकर, प्रशांत आपटे, दादा सोकटे, व्यापारी संघाचे अध्यक्ष विभा खानोलकर आदी उपस्थित होते.
या उपकेंद्राद्वारे कौशल्यावर आधारित असे आठ अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने आमदार केसरकर यांनी सदर अभ्यासक्रमाकरीता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्याशी सामंजस्य करार करावा. पर्यटन जिल्हा असल्याने येथे कृषी पर्यटनावर आधारित कार्यक्रम सुरु करावेत यासाठी अनुभवी टीम आणून येथे मार्गदर्शन करण्यात येईल, अशी माहिती कुलगुरु पेडणेकर यांनी दिली.
या प्रकल्पाच्या जागेसाठी तसेच कार्यालयीन वापरासाठी लागणा-या न.प.च्या तात्पुरत्या संगीत रिसॉर्ट या इमारती संदर्भात न. प. ने ठराव संबंधित खात्याकडे त्वरित पाठवावा. इमारत डागडुजीसाठी लागणारा निधी त्यांना देण्यात येईल, असे केसरकर यांनी सांगितले.
भावी पिढीसाठी महत्वाचा प्रकल्प असल्याने तो कमीतकमी कालावधीत पूर्ण व्हावा, यासाठी आमदार केसरकर व वेंगुर्ला न.प.ने प्रयत्न करावेत. उपकेंद्राकरिता जागा उपलब्ध करु देण्याबाबत सर्व सहकार्य राहील, असे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी सांगितले.
यावेळी प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्यावतीने कुलगुरु यांना चाफ्याच्या नवीन संशोधित केलेल्या कलमाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Close Menu