‘ओंजळ‘ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

रत्नागिरीच्या नवोदित कवयित्री सौ. सुस्मिता संजीव सुर्वे यांनी लिहिलेल्या आणि किरातट्रस्टतर्फे प्रकाशित केलेल्या ओंजळया काव्यसंग्रहाचे प्रकाशन त्यांच्या वाढदिवसादिवशी १३ जुलै रोजी घरच्या घरी साध्या पद्धतीने करण्यात आले.

     वेंगुर्ला हायस्कूलचे शिक्षक बाबा बोवलेकर यांच्या ज्येष्ठ कन्या संध्या बोवलेकर यांना त्यांच्या वडिलांकडून लेखनाचा वारसा मिळाला होता. लग्नानंतरही त्यांनी हा छंद जोपासताना काव्यलेखनात खंड पडू दिला नाही. त्यांच्या काही कविता वर्तमानपत्र तसेच दिवाळी अंकातही प्रसिद्ध झाल्या आहेत. स्वतःचा एखादा तरी काव्यसंग्रह प्रसिद्ध व्हावा अशी त्यांची प्रबळ इच्छा होती. त्यांची ही इच्छा चित्रकार व अभियंता असलेल्या मुलाने पूर्ण केली.

     सौ.सुस्मिता यांचे बालपण निसर्गाच्या सान्निध्यात गेल्याने निसर्गाशी त्यांची नाळ जोडली गेली आहे. आणि त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या कवितेत बहुतांशी दिसून येते. निसर्ग अगदी जवळून अनुभवल्यामुळे त्यांच्या कवितेत झाडे, वेली, पक्षी, फुले, नदी, समुद्र, डोंगर, पाऊस, इंद्रधनुष्य, वारा इत्यादीचा उल्लेख प्रकर्षाने जाणवतो. या निसर्गाकडून आपल्याला बरेच काही शिकण्यासारखे आहे फक्त शिकायची इच्छा हवी असे त्यांना वाटते. त्यांच्या ओंजळया काव्यसंग्रहाचे मुख्यपृष्ठ त्यांच्या मुलाने केले आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ गझलकार दिवंगत मधुसुदन नानिवडेकर यांची प्रस्तावना लाभली आहे. माझ्यासारख्या नवोदितांना नानिवडेकर सरांनी दिलेली प्रस्तावना ही मला मिळालेले प्रोत्साहन असल्याची भावना सौ.सुर्वे यांनी व्यक्त करीत त्यांना आदराजंली वाहिली.

   पुस्तकासाठी संफ – ९४२२४३२९३३    

Leave a Reply

Close Menu