वेंगुर्ल्यात ‘श…शिक्षणाचा‘ या लघुपटाचा शुभारंभ

श्री देवी सातेरी कला अकादमी व विद्या इंटरटेन्मेंट यांच्या विद्यमाने वेंगुर्ल्यात श…शिक्षणाचा‘ (एक पाऊल प्रगतीकडे) या मराठी लघुपटाचा शुभारंभ माजी जिल्हापरिषद शिक्षण सभापती व विद्यमान जिल्हापरिषद सदस्य विष्णुदास ऊर्फ दादा कुबल यांच्या हस्ते करण्यात आले.

     दिग्दर्शक मनोहर कावले व निर्माता विद्येश आईर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या लघुपटात शालेय जीवनात मोबाईलच्या होणा-या गैरवापराबाबत भाष्य करण्यात आले आहे. शिक्षणाला प्राधान्य देण्यासाठी एकत्र येऊन अशाप्रकारे उपक्रम राबविल्यास शिक्षणाच्या बाबतीत आजच्या युगात आपला जिल्हा हा नक्कीच प्रगतीपथावर पोहचू शकेल असे प्रतिपादन जिल्हापरिषद सदस्य विष्णुदास कुबल यांनी केले.

     या अगोदर विद्या इंटरटेन्मेंटने व्यसन मुक्तीवर प्रकाश टाकणारा (कायापालट) व वाया जात असलेल्या अन्नधान्य यावर (एक दाणा) हा मुखपट सादर करण्यात आला होता. या लघुपटामध्ये वेंगुर्ला तालुक्यातील स्थानिक नवोदित कलाकारांना संधी देण्यात आली. यामध्ये किशोर सोन्सुरकर, चंद्रशेखर कल्याणकर, संध्या आचार्य, कौस्तूभ आचार्य, पूर्वा जोशी, हेमंत नाईक, व्ही. एन. नंदगिरी, मनोहर कावले, अमेय धुरी, अनिकेत सावंत, अनुष्का आचार्य, श्रुष्टी आचार्य, सुयोग जोशी, कौशल गोसावी, यतीन कुडपकर, अर्जुन मिशाळे, संतोष शिंदे आदी कलाकारांनी भूमिका साकारल्या. यावेळी भूषण आंगचेकर, मारुती दोडणशेट्टी, चेतना आचार्य, अंगणवाडी सेविका स्नेहलता फाटक आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किशोर सोन्सुरकर यांनी तर आभार मनोहर कावले यांनी मानले.

Leave a Reply

Close Menu