वेतोरे हायस्कूलची राज्यस्तरावर निवड

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा) औरंगाबाद यांच्या वतीने उत्कृष्टेचा ध्यास घेऊन काम करणा-या शाळांच्या केस स्टडीजचे संकलन नुकतेच करण्यात आले. यात श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरे या एकमेव माध्यमिक शाळेची राज्यस्तरावर निवड झाली आहे. यानिमित्त संस्था चेअरमन दिगंबर नाईक व कार्यवाह प्रभाकर नाईक यांनी मुख्याध्यापिका स्वाती वालावलकर आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले आहे.

      अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके कितीही उद्दिष्टनुवर्ती असली, तरी प्रत्यक्षात शिक्षणप्रक्रियेत शाळेची भूमिका महत्त्वाची ठरते. श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरेने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्यादृष्टीने शाळेत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सुरु केलेला प्रवास निश्चितच इतरांना प्रेरणादायी ठरणारा आहे. नाविन्याची कास स्विकारणा-या या शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती वालावलकर यांनी शालेय प्रशासन, स्वयंविकास, अध्ययन-अध्यापन, सुधारणा, संघबांधणी, नवोपक्रम शालेय व्यवस्थापन या नेतृत्वाच्या सप्तसुत्रीतून आपल्या शाळेचे वेगळेपण, स्वतःची एक नवीन ओळख तयार केली आहे. यापूर्वी शाळेला उपक्रमशील शाळा पुरस्कारमिळाला आहे.  केवळ शाळेत जाणे, पुस्तकी अभ्यासक्रम पूर्ण करुन परीक्षा घेणे एवढेच काम माझा सहकारी शिक्षक वर्ग करीत नसून त्यापलिकडे यशस्वी जीवन जगण्याची कला ते विद्यार्थ्यांना अवगत करुन देत असल्याचे मुख्याध्यापक स्वाती वालावलकर यांनी यावेळी आवर्जून सांगत आभार मानले.

 

Leave a Reply

Close Menu