रानभाज्या महोत्सव २०२१ संपन्न

वेंगुर्ला तालुका कृषि विभागामार्फत येथील तालुका कृषि अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात रानभाज्या महोत्सव २०२१ संपन्न झाला. या महोत्सवात विविध प्रकारच्या ५३ वनौषधी रानभाज्यांचे प्रदर्शन मांडले होते. उद्घाटन सभापती अनुश्री कांबळी यांच्या हस्ते झाले. यावेळी तालुका कृषि अधिकारी हर्षा गुंड, कृषि पर्यवेक्षक विजय घोंगे, आर.एम.केसरकर, ‘आत्माव्यवस्थापक डी.एच.गोळम, प्रगतशील शेतकरी सुरेश धर्णे, बाळकृष्ण गाडगीळसह अनेक शेतकरी उपस्थित होते.

      या रानभाज्या महोत्सवात अळंबी, कांजी, चीना, घोटूळी, गुळवेल, कोडशी, कामोणी, भारंगी, टायकाळा, घेवडा, शेवगा, बोडकांदी, पानफुटी, रानवाल, लाल उक्शी, मंडुकपर्णी, सोनारवेल, पेवा अशा विविध ५३ रानभाज्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. या रानभाज्यांचे जतन व संवर्धन व्हावे हा यामागील उद्देश होता. यावेळी आत्माचे व्यवस्थापक धनंजय गोळम यांनी रानभाज्यांचे औषधी गुणधर्म व माणसाच्या निरोगी आयुष्यासाठी त्यांची उपयुक्तता याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन व आभार विजय घोंगे यांनी मानले.

Leave a Reply

Close Menu