शिक्षक सक्षमिकरणासाठि ‘टीचर टाॅक’ एॅपचे समाजसेवक श्री रामचंद्र दळवी यांच्या मार्फत लोकार्पण

सहकारी शिक्षकांशी संम्पर्क साधण्यासाठी, मतांची देवाणघेवाण करण्यासाठी, समस्या निवारण करण्यासाठी तसेच टिका टिप्पणी सामायिक शेअर करण्यासाठीचे व्यासपीठ अर्थात टीचर्स टाॅक हे एक विशेष अॅप्लिकेशन आहे. हे एॅप शिक्षकांच्या कार्यक्षेत्राची संधी तर वाढवेलच त्या सोबत शिक्षक समुद्राच्या उन्नतीसाठी काम करेल. महाराष्ट्रातील शिक्षण समुदायाच्या सक्षमीकरणासाठी एस आर दळवी (आय) फाऊंडेशनचे संस्थापक श्री रामचंद्र दळवी यांनी या टीचर टाॅक एॅपचे नुकतेच लोकार्पण केले. सदर एॅप टीच ओ टीच सोशल संस्थेने विकसित केले आहे.
         डिजिटलायझेशनच्या वेगवान युगात सुसंगत शिक्षकांचा व्यावसायिक विकास व्हावा यादृष्टीने सदर एॅप ची निर्मिती केली आहे. यामुळे शिक्षण व्यवस्था अधिक बळकट होईल आणि शिक्षकांचा सन्मानही वाढेल. सदर एॅपमुळे शिक्षक सल्लागार समिती शिक्षण विभाग आणि शाळा यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाची दरी नाहीशी होण्यास मदत होईल. महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट करणे हे या एॅप चे उद्दीष्ट्य आहे.
         नोंदणीकृत शिक्षक या नव्या एॅप द्वारे सर्वेक्षण करु शकतात. स्थानिक प्रश्न सोडवू शकतात, तक्रारी नोंदवून शकतात, स्थानिक घटनांबद्दल स्वताला अद्ययावत करु शकतात. याशिवाय सवलतीच्या दरात घरगुती अन्य वस्तू खरेदी करु शकतात. सदर एॅप गुगल प्ले वर उपलब्ध असून तेथून डाऊनलोड करणे शक्य आहे.
          शिक्षकांच्या गरजा आम्ही जाणतो. एस आर दळवी (आय) फाऊंडेशन शिक्षकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठीच स्थापन करण्यात आले आहे. या फाऊंडेशन द्वारे शिक्षकांच्या व्यावसायिक समस्या निश्र्चित सोडविल्या जातील. शिक्षकांच्या मुलभूत तत्वांचा मजबूत पाया तयार करण्यासाठी या एॅप ची मदत होईल. जगावर अधिराज्य करण्यासाठी विद्यार्थ्यांना ही या एॅप मुळे मदत होईल. त्यासोबतच अडचणीही दूर केल्या जातील. राज्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका शिक्षकांनी बजावली आहे. आणि सदस्य शिक्षण व्यवस्थेत बदल करण्यासाठी शिक्षकांना आम्ही नक्की मदत करु असे एस आर दळवी (आय) फाऊंडेशनचे सहसंस्थापक रामचंद्र दळवी म्हणाले.
          विद्यार्थी तसेच शिक्षकांची प्रगती आणि समाधान हे आमच्या अस्तित्वाचाचे मुळ आहे. आम्हाला शिक्षकांशी सखोल आणि सकारात्मक संबंध स्थापित करायचा आहेच पण तो आत्मविश्वासपूर्ण आणि नाविन्यपूर्ण हवा. असेही दळवी पुढे म्हणाले

Leave a Reply

Close Menu