चित्रकार सुनिल नांदोस्कर ‘स्वच्छता संदेश दूत‘

वेंगुर्ला न.प.तर्फे राबविण्यात येणा-या स्वच्छ, वसुंधरा अंतर्गत विविध उपक्रमांसाठी जनप्रतिसाद मिळावा म्हणून अभिनेता, लेखक, निर्माता अमरजित आमले यांच्यासोबत वेंगुर्ल्याचे सुपुत्र तथा चित्रकार व कलादिग्दर्शक सुनिल नांदोस्कर यांची स्वच्छता संदेश दूतम्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

     या निवडीवेळी सुनिल नांदोस्कर यांनी साकारलेल्या वेंगुर्ला शहराची ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा दर्शविणा-या शिल्पाकृतीचे श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी सुनिल नांदोस्कर, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, मुख्याधिकारी यांच्यासह स्वच्छता कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी व नागरिक उपस्थित होते

Leave a Reply

Close Menu