स्वच्छता मित्र निवड व वृक्षमित्र सत्कार

     वेंगुर्ला शहरातील आठ प्रभागात प्रत्येकी एक याप्रमाणे स्वच्छता मित्र म्हणून नियुक्त केलेल्या संजय पुनाळेकर, अमेय धुरी, महेंद्र धुरी, श्रीकांत रानडे, बाबी रेडकर, शरद मेस्त्री, वासुदेव परब, चंद्रकांत जाधव यांना नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. माझी वसुंधरा प्राचीन वृक्ष संवर्धनमोहिमेंतर्गत ५० वर्षाहून प्राचिन वृक्षांचे संरक्षण व संवर्धन करुन वेंगुर्ला शहराचे हरित आच्छादन वाढविण्यासाठी मोलाचे योगदान देणारे न.प.चे माजी नगराध्यक्ष शिवाजीराव कुबल यांना वृक्षमित्रम्हणून सन्मानित करण्यात आले.

     स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमावेळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, मुख्याधिकारी यांच्यासह स्वच्छता कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu