►वेंगुर्ला बंदरावर नारळी पौर्णिमा उत्साहात

दरवर्षी वेंगुर्ला बंदरावर नारळी पौर्णिमा सण बहुसंख्य नागरिकांच्या उपस्थितीत साजरा केला जातो. गतवर्षी कोरोनामुळे हा सण अगदी मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला होतो. यावर्षी अनलॉकमुळे हा सण साजरा करता आला. यावेळी वेंगुर्ला पोलिस स्टेशनतालुका पत्रकार समिती आणि राष्ट्रवादी पक्षातर्फे नारळ अर्पण करण्यात आला. वेंगुर्ला पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक तानाजी मोरेतालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदिप सावंत आणि राष्ट्रवादीचे जिल्हा सदस्य नितीन कुबल यांनी यांनी नारळाचे विधीवत पूजन केले. त्यानंतर या सर्वांनी समुद्रात नारळ अर्पण केला.

      यावेळी महिला पोलिस उपनिरिक्षक रुपाली गोरडसहाय्यक पोलिस उपनिरिक्षक सचिन सावंतशेखर दाभोलकरपोलिस हवालदार वासुदेव परबमहिला पोलिस नाईक रुपा वेंगुर्लेकरपोलिस नाईक गौरव परबनितीन चोडणकरविठ्ठल धुरीपोलिस कॉन्स्टेबल मनोज परुळेकरराहूल बरगेबंटी सावंतअमर कांडरमहिला कॉन्स्टेबल पूजा भाटेसुरज रेडकर तसेच पत्रकार समितीचे के.जी.गावडेभरत सातोस्करअजित राऊळविनायक वारंगसुरज परबप्रथमेश गुरव आदी उपस्थित होतेवेंगुर्ला शहरातील नागरिकांनीही समुद्राला नारळ अर्पण केला.

Leave a Reply

Close Menu