गाळेधारकांचा आत्मदहनाचा इशारा

जुना ई-लिलाव रद्द करुन ज्यांनी ज्यांनी ई लिलावात भाग घेतला त्यांची अनामत व ई लिलाव फी परत करुन नविन संपूर्ण प्रक्रिया राबवावी, मंत्र्यांच्या आदेशाला हरताळ फासू नयेत तसेच जुन्या त्या १५ गाळेधारकांना त्याच जागेत शासनाच्या नियमानुसार गाळे देऊन सहकार्य करावे. अन्यथा आम्हाला आत्मदहन आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल व त्यास सर्वस्वी आपण जबाबदार रहाणार, असा इशारा लेखी निवेदनाद्वारे २३ ऑगस्ट रोजी वेंगुर्ला तालुका व्यापारी संघातर्फे मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंगडे यांना देण्यात आला आहे.

         यावेळी विवेक खानोलकर, राजेश शिरसाट, राजन गावडे, लक्ष्मण दिपनाईक, किशोर परब, शाम शेटये, संजय तानावडे, भाऊ सातार्डेकर, श्रीपाद सामंत, सदानंद नवार, कादर दोस्ती आदींसह अन्य व्यापारी उपस्थित होते

Leave a Reply

Close Menu