‘त्या‘ १५ गाळ्यांसाठी ई-लिलाव प्रक्रिया

सागररत्न मत्स्यबाजारपेठेच्या तळमजल्यावर एकूण १५ दुकान गाळ्यांच्या लिलाव प्रक्रियेसाठी जुन्या गाळेधारकांना 1st Right to Refusal च्या तत्वाचा वापर  करुन २० ऑगस्टपासून eauction.gov.in या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध झाले आहेत. अर्ज सादर करण्याची शेवटची मुदत ३ सप्टेंबर रोजी सायं.५.३० पर्यंत असून याचदिवशी सायं. ६ वाजेपर्यंत धनाकर्ष सादर केलेल्या लिलावधारकांना ७ सप्टेंबर रोजीच्या प्रत्यक्ष ई लिलाव प्रक्रियेमध्ये संकेतस्थळावर दिलेल्या वेळापत्रकानुसार भाग घेता येणार आहे. 1st Right to Refusal म्हणजेच एखाद्या गाळ्यासाठी भाग घेतलेल्या सर्व लिलावधारकांमधून जी सर्वोच्च बोली लागेल त्या बोलीची रक्कम त्या क्रमांकाच्या गाळ्यांसाठी न.प.कार्यालयाच्या अभिलेखावरती नोंद असणा-या व्यक्तीने भरण्याबाबत तयारी दर्शविली तर त्यांना गाळा वितरीत करण्यात येईल. या करीता त्या क्रमांकाच्या गाळ्याच्या लिलाव प्रक्रियेमध्ये सदर व्यक्तीचा (जुन्या गाळेधारकाचा) सहभाग नसल्यास तो गाळा सर्वोच्च बोली लावणा-या लिलावधारकाला वितरीत करण्यात येईल. जुन्या लिलावधारकांना या लिलावात भाग घेण्याकरिता जुने धनाकर्ष वापरता येणार असल्याने तसेच कोणतेही अतिरिक्तचे शुल्क नसल्याने नागरिकांनी या लिलावात भाग घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष गिरप यांनी केलेले आहे.

Leave a Reply

Close Menu