श्रावणी संस्कार संपन्न

श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी यज्ञोपवीत किंवा जानवे बदलण्याची प्राचीन वैदिक परंपरा आहे. या हिदू परंपरेत श्रावणीहा धार्मिक संस्कार सांगितला असून श्रावणी संस्कारजिल्ह्यासह वेंगुर्ला येथील ब्राह्मणांनी एकमुखी दत्तमंदिर, कुबलवाडा येथे सामुदायिकरित्या साजरा करण्यात आला.

      मौजीबंधन झालेल्या प्रत्येक व्यक्तीने गळ्यात यज्ञोपवीत (जानवे) धारण करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक यज्ञोपवीत जानवे तीन सूत्रांचे (दो-यांचे) असून त्यावर तीन वेद, त्रैलोक, तीन अग्नी, तीन ऋणे यांचा वास असतो. प्रत्येक जानव्याच्या ब्रह्मगाठीवर ओंकार नाद व तीन मात्रा वास करतात गाठी बाहेरील टोकावर गायत्री देवीचा वास असतो.

     श्रावणातील पौर्णिमेला जुने यज्ञोपवीत बदलून नवीन यज्ञोपवीत धारण करावयाचे असते. ब्राह्मण ज्ञातिबांधवात याला श्रावणी संस्कारम्हटले जाते. यावेळी दोन हवने करतात. पहिल्या हवनात मागील वर्षभरात झालेल्या वाईट घटना, अन्य दोषांबाबत प्रायश्चित्त घेण्यात येते. यावेळी माती, भस्म, गोमुत्र, गोमय, दर्भाने आंघोळ केली  जाते. त्यानंतर शारिरीक, मानसिक शुद्धी होण्यासाठी पंचगव्याचे प्राशन होते. त्यानंतर देवी अरुंधतीसह सप्तऋषींची पूजा केली जाते. यानंतर पुढील वर्षभरात चांगले आयुष्य, आरोग्य लाभण्यासाठी अग्नीदेवतेची प्रार्थना करुन नवीन यज्ञोपवीत धारण केले जाते. यावेळी नवीन यज्ञोपवीत व काही धनाचे दानही केले जाते. यज्ञोपवीत धारण केल्याने बुद्धीचे ज्ञानसंवर्धानात परिवर्तन होते.

      श्रावण पौर्णिमा ही पोवती पौर्णिमाम्हणूनही ओळखली जाते. ग्रामदेवतेकडे रितीरिवाजानूसार ह्या दिवशी सुताची पोवती करुन पंचायतनातील सर्व देवतांना अर्पण करतात. यानंतर ही पोवती घरातील पुरुष धारण करतात.

Leave a Reply

Close Menu