►वेंगुर्ल्यात नारायण राणेंचा उद्या नागरी सत्कार

केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर नारायण राणे हे २९ ऑगस्ट रोजी पहिल्यांदाच वेंगुर्ला येथे येणार आहेत. यानिमित्त त्यांच्या जल्लोषी स्वागताबरोबरच विविध संस्थांच्यावतीने नागरी सत्कारही होणार आहे.

      रविवारी संध्याकाळी ६ वाजता शिरोडा नाका येथे रेडी जिल्हा परिषद गटातर्फे सत्कार, तर ६.३० वाजता मांडवी गार्डन येथे स्वागत व वेंगुर्ल्यातील व्यापारी संघटना, सरपंच संघटना, ओबीसी संघटना, मुस्लिम संघटना, मराठा समाज, महिला बचत गट प्रतिनिधी व पदाधिकारी, शेतकरी सन्मान लाभार्थी, देवस्थान कमिटी, ख्रिस्ती समाज बांधव, कुंभार समाज, उज्वला गॅस योजना लाभार्थी, पंतप्रधान आवास योजना लाभार्थी, आत्मनिर्भर योजना (पथ विक्रेते), किरकोळ व्यापारी, गाबीत समाज, गिरणी कामगार प्रतिनिधी, सुवर्णकार प्रतिनिधी व बार असोसिएशन यांच्यावतीने केंद्रीय मंत्री राणे यांचा नागरी सत्कार करण्यात येणार.

      यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे व उपस्थित मान्यवर आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. तर ७ वाजता वेंगुर्ला नगरपरिषदेच्या क्रॉफर्ड मार्केटचे उद्घाटन तर ७.३० वाजता मठ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जन आशीर्वाद यात्रेचा समारोप होणार आहे. या यात्रेस उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई व वेंगुर्ला भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर व स्मिता दामले यांनी केले आहे.

Leave a Reply

Close Menu