दशावतारी डॉक्युमेंटरीचा होणार गौरव

दशावतारी लोककला अभ्यासक प्रा.वैभव खानोलकर यांच्या संशोधनातून दशावतार लोककलेच्या डॉक्युमेंटरीचा व्हिडीओ पहिल्या श्रावण सोमवारचे औचित्य साधून युट¬ुब या सोशल मिडियावर प्रसारित केला आहे. या डॉक्युमेंटरीची दखल राज्यस्तरावर मानवसेवा फाऊंडेशनने घेतली असून  प्रा.खानोलकर यांच्या डॉक्युमेंटरीला अमरावती येथे होणा-या कार्यक्रमात गौरवले जाणार असल्याचे माहिती या फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.पाटील यांनी दिली आहे.

    या डॉक्युमेंटरीसाठी हेमंतकुमार कुलकर्णी, सिद्धेश सावंत, राजाराम धुरी, कमलेश खानोलकर, शार्दुल खानोलकर, तेजस खानोलकर, हिंमाशु खानोलकर आणि गणेश खानोलकर यांनी विशेष सहकार्य केले आहे. प्रा.खानोलकर यांनी हा गौरव माझा नसून माझ्या दशावतार लोककलेचा, दशावतारी कलावंताचा आणि या लोककलेवर प्रेम करणा-यांचा आहे असे सांगत मानवसेवा फाऊंडेशनचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Close Menu