जागतिक नारळ दिनानिमित्त 2 सप्टेंबर रोजी महिला काथ्या कामगार औद्योगिक संस्थेत नारळ दिन साजरा करण्यात आला. यावेळी कृषी अधिकारी हर्षा गुंड, प्रज्ञा परब, उद्योजक उमेश येरम, डॉ. संजीव लिंगवत, सदाशिव आळवे, आर्किटेक्टडिसोजा, संजना कदम, नितीन कुबल, सत्यवान साटेलकर, रंजीत हेवाडे, प्रविणा खानोलकर, श्रुती रेडकर आदी उपस्थित होते. नारळाच्या झाडाला नुसता कल्पवृक्ष नाही तर त्याचे फायदे पहाता त्याला महाकल्पवृक्ष म्हणून संबोधले जायला हवे असे प्रतिपादन फळ संशोधन केंद्राच्या बी.एन.सावंत यांनी केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजाभाऊ लिमये यांची आठवण केलीच पाहिजे. परंतु, राज्यात नारळ बोर्डचे कार्यालय सुरु झाले पण निधी नाही ही खंत एम.के.गावडे यांनी बोलून दाखवली.

Leave a Reply

Close Menu