गणेश चतुर्थी सण कालावधीतील तालुक्याचे नियोजन

गणेश चतुर्थी कालावधीत बाहेर गावांहून येणा-या लोकांकडे कोव्हीड लसीचे दोन डोस घेतले असल्यास त्यांच्या कोव्हीड तपासणीची गरज नाही. पण एक लस डोस किंवा एकही लस डोस न घेतलेला असल्यास त्यांची अँटीजन रॅपीड टेस्ट करावीयाबाबत जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आरोग्य विभागाने उपाय योजना राबवावी. अशा सूचना आरोग्य विभागास देत सण कालाधीत कोठेही गर्दी करु नये तसेच नागरीकांनी नियमीतपाणे मास्कचा वापर करावा. व गणेश चतुर्थी सण उत्साहात साजरा करावाअसे आवाहन वेंगुर्ला तहसिलदार प्रविण लोकरे यांनी तालुकास्तरीय गणेश चतुर्थी नियोजन बैठकीत केले.

      येथील तहसिलदार कार्यालयात तालुकास्तरीय गणेश चतुर्थी नियोजन बैठक तहसिलदार प्रवीण लोकरे यांच्या अध्यक्षतेखली संपन्न झाली. यावेळी महसुल नायब तहसिलदार एल.एम.फोवकांडेपोलीस निरीक्षक तानाजी मोरेगटविकास अधिकारी उमा पाटीलनगराध्यक्ष दिलीप गिरपमुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगेनिवती पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. वारंगसार्वजनिक बांधकाम विभागाचे एन.आर.कानडेवेंगुर्ला बी.एस.एन.एल. केंद्राच्या अधिकारी समृध्दी कामतव्यापारी संघाचे अध्यक्ष विवेक खानोलकरशिरोडा व्यापारी संघाचे अध्यक्ष राजन गावडेसचिव सचिन गावडेगटविकास अधिकारी यांचे प्रतिनीधी एस.बी.चव्हाणटी.बी.नवारनगरसेवक नागेश गावडेपोलीस कर्मचारी गजेंद्र भिसेपी.जी.सावंतट्रॅफिक पोलीस मनोज परूळेकरपंचायत समिती आरोग्य विस्तार अधिकारी सच्चिदानंद परबनगरपरीषद सहाय्यक कार्यालयीत अधिक्षक वैभव म्हाकवेकरफळ विक्रेते प्रितम जाधवदत्तप्रसाद शारबिद्रेशेखर धावडेजगन्नाथ खवणेकर यांचा समावेश होता.

      या बैठकीवेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी व सावंतवाडी प्रांताधिकारी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तहसीलदार यांना या कालावधीतील मार्गदर्शक सूचनांबाबत मार्गदर्शन केले. त्यानुसार हिंगोली तहसीलदार यांनी तालुक्यातील उपस्थित पदाधिकारी विविध संस्थांचे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी यांना मार्गदर्शन केले.

      स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकारी व प्रशासनाने दुकानांचे नियोजन करण्यांत यावेसण कालावधीत बाहेर गावांहून येणा-या भाविकांची कोव्हीड तपासणी संदर्भात जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सुचनांनुसार आवश्यक ती तपासणी संदर्भातील उपाय योजना तालुका आरोग्य विभागामार्फत करण्यांत यावीउभादांडा मानसीश्वर येथे विक्री होणाया मासळीच्या ठिकाणी घाण वास येतो. तेथील दुर्गधी दूर करण्यासाठी उभादांडा ग्रामपंचायतीने त्वरित उपाय योजना राबवावी. वहातुक कोंडीलाईट व्यवस्था चोख ठेवावी. याबाबत चर्चा होऊन स्थानिक प्रशासनाने उपाय योजना राबवावी. असे तहसिलदार यांनी सुचित केले.

Leave a Reply

Close Menu