गणेश चतुर्थीचा सण दिव्यांगांनाही इतरांप्रमाणे साजरा करता यावा यासाठी राष्ट्रीय अपंग विकास महासंघ सिधुदुर्ग व काळसे पंचक्रोशी अपंग संस्थेच्यावतीने केलेल्या आवाहनला उत्स्र्फूत प्रतिसाद मिळाला. दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने सुमारे १२० दिव्यांग व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यामुळे दिव्यांगांची गणेश चतुर्थी सुखकर होण्यास मदत झाली आहे.

      सिधुदुर्ग जिल्ह्यातील भगिरथ प्रतिष्ठानचे डॉ.प्रसाद देवधर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, दुर्वांकूर ज्वेलर्स कुडाळ, गायत्री आनंदयात्री फाऊंडेशन मुंबईच्या शिल्पा पाटकर, स्नेहल कठारे, पल्लवी जंगम, सुस्मीता भिवंडे व मालवण येथील बॅ.नाथ पै सेवांगण यांनी जीवनावश्यक वस्तूंसाठी सहकार्य केले.

      जिल्ह्यातील तुळस, पणदूर, काळसे, पेंडूर व धामापूर येथील दिव्यांगांना वस्तू वितरण करतेवेळी राष्ट्रीय अपंग विकास महासंघ, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष व सिधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब पाटील, महासंघाचे जिल्हा सचिव संदिप पाटकर, दिव्यांग मित्र अनिल पाटील, विनोद धुरी, ऊर्मिला चव्हाण, विनायक चव्हाण, संकेत पाटील, अमित पाडवे व योगेश पाटकर आदी उपस्थित होते. या उपक्रमासाठी शेखर सामंत यांचेही सहकार्य लाभले.

Leave a Reply

Close Menu