वेंगुर्ला तालुक्यासह शहरात घरोघरी आज उत्साहपूर्ण वातावरणात गणपतीचे पूजन करण्यात आले. गणपती शाळेतून गेले दोन दिवस गणपती घरी नेतानाचे चित्र आजही सकाळही पहायला मिळाले.

      भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घरोघरी गणपतीचे पूजन करण्याची परंपरा आहे. त्यानुसार आज घरोघरी गणपतींचे पूजन करण्यात आले. गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अटी व नियमांचे पालन करुन अगदी साध्या पद्धतीत गणेश चतुर्थीचा सण साजरा केला होतो. यावर्षी मात्र, शिथिलता असल्याने भक्तांच्या चेह-यावर उत्साही वातावरण पहायला मिळाले. आज पहाटेपासूनच घरोघरी गणपतीच्या पूजनाला प्रारंभ झाला. ब्राह्मणांच्या मंत्रघोषात, फटाकांच्या आतषबाजीत पूजन करण्यात आले. घरोघरी आरतीचेही सूर निनादू लागले आहे. भजनाच्या माध्यमातून गणेशाची सेवा करण्यासाठी भजन मंडळेही सज्ज झाली असून सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत ही भजने चालणार आहे. असे हे मंगलमय वातावरण अनंत चतुदर्शीपर्यंत पहायला मिळणार आहे. 

Leave a Reply

Close Menu