सुभाष साबळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

शिक्षक दिनाचे औचित्य साधून सुभाष साबळे यांना हातभार चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व रोख रक्कमेसह राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. श्री. साबळे यांनी लॉकडाऊन काळात केलेली कोरोनाविषयक जनजागृती उल्लेखनीय असल्याचे गौरवोद्गार आयुर्वेदाचार्य डॉ. शिवानी गवंडे यांनी काढले. यावेळी अध्यक्ष शैलेश मयेकर, सचिव एकनाथ चव्हाण, अस्मिता भराडी, खजिनदार नयनेश गावडे उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu