सौ. अनघा आईर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुंबई महापालिकेतर्फे प्रतिवर्षी पालिकेच्या शिक्षण विभागातील ५० गुणवंत शिक्षकांना आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार दिला जातो. सन २०२१च्या पुरस्कारामध्ये मठ येथील सौ.अनघा सुनिल आईर यांना आदर्श पुरस्कार जाहिर झाला. मुंबई महापौर किशोरीताई पेडणेकर यांचे हस्ते सौ.आईर यांना शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सौ.आईर या महानगरपालिकेच्या गव्हाणपाडा (मुलुंड) मराठी शाळेत कार्यरत असून या शाळेत शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या उत्कृष्ट उपक्रम राबविले आहेत.

       सौ. आईर या मठ गावच्या स्नुषा असल्याने गणेश चतुर्थी निमित्त त्या गावी आल्या असता सरपंच तुळसीदास ठाकूर, ग्रामस्थ अजित धुरी, सद्गुरु गावडे, सुनिल शेटकर, प्रकाश ठाकूर, ललितकुमार ठाकूर, प्रा.शिवराम ठाकूर, रविद्र आईर, दिपक आईर, उमेश आईर यांच्या उपस्थित त्यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Close Menu