प्रत्येकात हजरजबाबीपणा हवा-दाभोलकर

कुडाळ-एमआयडीसी येथील बॅ.नाथ पै शिक्षण संस्था (सिधुदुर्ग) यांच्यावतीने महान संसदपटू बॅ.नाथ पै यांची ९९वी जयंती सोहळा तसेच सन २०२१-२२ हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यात येत आहे. यानिमित्ताने संस्थेच्या सभागृहात २५ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळी प्रसिद्ध चित्रकार अरुण दाभोलकर, समाजवादी नेत्या कमलताई परुळेकर, पत्रकार शेखर सामंत, अदिती पै, शैलेंद्र पै, नीता पै, शरद चव्हाण, बॅ.नाथ पै शिक्षण संस्था चेअरमन उमेश गाळवणकरसीईओ अमृता गाळवणकर, जि.प.सदस्य अमरसेन सावंत, सचिन वालावलकर, अमित कामत, नर्सिग प्राचार्य मीना जोशी, उपप्राचार्य कल्पना भंडारी, महिला महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज, फिजिओथेरपी कॉलेजचे प्राचार्य सुरज शुक्ला, बीएडचे प्राचार्य परेश धावडे, सीबीएसईच्या प्राचार्य स्वरा गावडे, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अर्जुन सातोस्कर आदी उपस्थित होते.

     हजरजबाबीपणा जो कोकणी माणसाचा गुण आहे, त्याचा उपयोग देशाच्या राजकारणामध्ये आपल्या कर्तृत्वाने सिद्ध करणारे बॅ.नाथ पै हे कोकणचे व्यक्तिमत्व होते. अभ्यासुवृत्तीचा लोकनेता देशाने अनुभवला. त्यांच्या या प्रामाणिक व लढवय्या नेतृत्वामुळे ते स्मरणात राहिले. त्यांच्याप्रमाणेच प्रत्येक व्यक्तिमत्त्वामध्ये हजरजबाबीपणा असे आवश्यक असल्याचे मत चित्रकार दाभोलकर यांनी व्यक्त केले.

     नाथ पै यांच्या राजकारण केवळ प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी नव्हती. त्यांनी आपल्या कार्यातून समाजप्रबोधन केले. त्यांच्यासारखे व्यक्तिमत्व आज संसदेत असते, तर सरकारच्या बारीकसारिक गोष्टींवर त्यांनी लक्ष ठेवले असते असे कमलताई परुळेकर म्हणाल्या.

 

Leave a Reply

Close Menu