► उपनगराध्यक्ष पदासाठी ५ रोजी पोटनिवडणूक

      मच्छिमार्केटचे बांधकाम करताना प्रस्थापित झालेल्या त्या‘ १५ गाळेधारकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करीत तत्कालीन उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ यांनी २६ ऑगस्ट रोजी आपल्या पदाचा राजिनामा दिला होतो. नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी तो मंजूरही केला होता. दरम्यानया रिक्त उपाध्यक्ष पदासाठी ५ ऑक्टोबर रोजी सावंतवाडी येथील महसूलचे उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी ११ ते १ या वेळेत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विशेष सभा घेण्यात येणार आहे. उपाध्यक्ष पदासाठी इच्छूक उमेदवाराने ५ रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत आपले नामनिर्देशनपत्र मुख्याधिकारी यांच्याकडे सादर करावयाचे आहे. त्यानंतर छाननी व पात्र उमदेवारांची नावे जाहीर झाल्यावर मतदान होईल आणि पिठासीन अधिका-यामार्फत निकाल जाहीर केला जाईल असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Close Menu