‘ध्यास स्वच्छतेचा‘ पथनाट्याद्वारे स्वच्छतेचा संदेश

वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव २०२१-२२ स्वच्छता व पर्यावरण संवर्धन मोहिमे अंतर्गत ध्यास स्वच्छतेचा‘ हे पथनाट्य शहरात सादर करण्यात आले. या पथनाट्याद्वारे नागरिकांना स्वच्छता संदेश देण्यात आले.

      केंद्र शासनामार्फत सन २०२१-२२ हे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव वर्ष म्हणून साजरे करण्याचे आदेश नगरपरिषद व नगरपंचायत यांना प्राप्त झाले आहेत. त्यानुसार आझादीका अमृत महोत्सव‘ ही स्वच्छता व पर्यावरण संवर्धन मोहीम राबवली जात आहे. या अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत दि.२६ जुलै ते दि.२ ऑक्टोबर या कालावधीत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव २०२१ या अभियान अंतर्गत विविध उपक्रम हाती घेतले आहेत. याचाच एक भाग म्हणून गुरुवारी ध्यास स्वच्छतेचा‘ हे पथनाट्य शहरात सादर करण्यात आले.

      शहरातील सागररत्न मत्स्य बाजारपेठ येथे तसेच दाभोली नाका येथे सखी स्वयंसहाय्यता महिला बचत गट खांबड-भटवाडीवेंगुर्ला यांच्या मार्फत हे स्वछता संदेश देणारे पथनाट्य सादर करण्यात आले. या पथनाट्यात शहरात स्वछता ठेवाउघड्यावर कचरा टाकू नकानगरपरिषदेने दिलेल्या कचरा पेटीचा वापर करुन कचरा वर्गिकरण करा व घंटागाडीत तो कचरा द्या अशा प्रकारचे अनेक संदेश देण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरपमुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगेगटनेते प्रकाश डिचोलकरनगरसेवक शितल आंगचेकरधर्मराज कांबळी यांच्यासह नगरपरिषद प्रशासकीय अधिकारीकर्मचारी उपस्थित होते. या पथनाट्याचे नियोजन नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिकारी संगीता कुबलसहाय्यक प्रकल्प अधिकारी विलास ठुंबरेशहर समन्वयक सुश्मित चव्हाणसमूह संघटक अतुल अडसूळ यांनी केले.

Leave a Reply

Close Menu